Rich dad poor dad marathi pdf download | रिच डॅड पुअर डॅड मराठी पीडीएफ

नमस्कार मित्रांनो या ब्लॉग पोस्ट मध्ये आपण Rich dad poor dad marathi pdf download करण्यासाठी डाउनलोड लिंक दिली आहे. रिच डॅड पुअर डॅड मराठी पीडीएफ हे सर्वात जास्त विक्री होणारे फिनान्शिअल पुस्तक आहे. रिच डॅड पुअर डॅड या पुस्तकाचे लेखक आहेत रॉबर्ट कियोसाकी.

Rich dad poor dad Marathi pdf free | रिच डॅड पुअर डॅड

रिच डॅड पुअर डॅड मराठी पीडीएफ

रॉबर्ट कियोसाकी रिच डॅड पुअर डॅड मध्ये म्हणतात “पैशांबाबतच्या अशा गोष्टी जे श्रीमंत आपल्या मुलांना
शिकवतात ,आणि गरीब व माध्यम वर्गीय आपल्या मुलांना शिकवत नाहीत”
या गोष्टींचा उल्लेख त्यांनी आपल्या पुस्तकात केला आहे. Rich dad poor dad Marathi pdf free.

Rich dad poor dad pdf in Marathi

रिच डॅड पुअर डॅड हे जगातील सर्वात लोकप्रिय पुस्तकांपैकी एक पुस्तक आहे. Stoxind या वेब साईट वर आपण हे पुस्तक pdf स्वरूपात फ्री मध्ये डाउनलोड कारण्यासाठी देत आहे. रिच डॅड पुअर डॅड मराठी पीडीएफ जर तुम्हाला आवडले असेल तर तुम्ही आपल्या वेबसाईट ची लिंक तुमचा मित्रांसोबत किंवा परिवार सोबत शेअर करू शकता.

रिच डॅड पुअर डॅड विषयी जागतिक कीर्तीचे विख्याते काय म्हणतात.

आर्थिक परिस्थिती सुधारण्याची असेल तर r अवश्य वाचा, तुमच्या आर्थिक भविष्यासाठी आणि बाजारपेठेच्या अभ्यासासाठी ते उपयुक्त आहे. [झील झिलगार]

श्रीमंत कसं व्हायचं आणि असलेलं कसं टिकवून ठेवायचं, याविषयीची साद्यंत माहिती, खरंतर शहाणपण हवं असेल, तर हे पुस्तक अवश्य वाचा! सर्वांत महत्त्वाचं म्हणजे तुमच्या मुलांनाही वाचायला लावा. त्यासाठी गरज पडल्यास त्यांना लाचही द्यायला हरकत नाही! मार्क व्हिक्टर हनसन (सहलेखक, न्यू यॉर्क टाइम्स, चिकन सूप फॉर द सोल)

रिच डॅड, पुअर डॅड हे काही पैशांविषयीच्या इतर पुस्तकांसारखं नाही. एकतर हे वाचायला सोपं आहे आणि त्यातील महत्त्वाचे संदेशही सहजपणे उमगतील इतक्या सोप्या भाषेत आहेत. – होनोलूलू मॅगझिन

मी तरुण असताना हे पुस्तक वाचायला हवं होतं किंवा खरंतर माझ्या पालकांनीच हे पुस्तक वाचणं जास्त उपयुक्त ठरलं असतं. तुम्हाला जितकी मुलं आहेत, त्या प्रत्येकाला है पुस्तक विकत घेऊन द्या. नातवंडांसाठीही काही प्रती खरेदी करून ठेवा. मूल ८-९ वर्षांचं झालं, की त्याला हे पुस्तक भेट म्हणून द्यायलाच हवं. – – स्यू ब्रॉन (अध्यक्ष, टेनंट चेक ऑफ अमेरिका)

रिच डॅड, पुअर डॅड हे पुस्तक म्हणजे चटकन श्रीमंत होण्याचा मंत्र नाही. हे पुस्तक तुम्हाला तुमच्या आर्थिक बाबी जबाबदारीनं कशा हाताळायच्या हे सांगतं. पैशांवर प्रभुत्व मिळवून मालमत्ता वाढवायला हे पुस्तक शिकवतं. तुम्हाला तुमची आर्थिक बुध्दिमत्ता वाढवायची असेल, तर हे पुस्तक नक्की वाचा. – डॉ. एड कोकेन (अर्थशास्त्राचे प्राध्यापक, आरएमआयटी विद्यापीठ, मेलबोर्न)

शिकण्यासाठी काम करा पैशांसाठी नको रिच डॅड पुअर डॅड मराठी पीडीएफ

९५ची गोष्ट आहे. मी सिंगापूरमधल्या एका वर्तमानपत्राच्या प्रतिनिधीला मुलाखत देत होतो. माझी मुलाखत एका तरुण महिला पत्रकारानं घेतली होती. आम्ही एका हॉटेलच्या प्रतीक्षालयात भेटलो. कॉफीचे घुटके घेत माझ्या सिंगापूर भेटीबद्दल बोलत होतो. मी आणि झिग झिगलर असे दोघं दुसऱ्या दिवशी व्याख्यान देणार होतो. ते मोटिव्हेशन या विषयावर बोलणार होते, तर माझा विषय होता ‘श्रीमंतांची गुपितं!’ १ ९

‘मला एक ना एक दिवस तुमच्यासारखी बेस्ट सेलर ऑथर व्हायचं आहे,’ ती म्हणाली. मी तिचे लेख वाचले होते. त्यांची माझ्यावर छापही पडली होती. ती खरंच चांगली लेखिका होती. तिच्या लेखनाची शैली मोकळी आणि संवादी होती. ‘नक्की होशील. तुझी लेखनशैली खरंच चांगली आहे,’ मी म्हणालो, ‘मग अडचण काय आहे?’

‘माझं लेखन कोणीही छापण्यासाठी स्वीकारत नाही,’ ती शांतपणे सांगू लागली, ‘प्रत्येकजण म्हणतो, की माझ्या कादंबऱ्या अव्वल दर्जाच्या आहेत; पण पुढे काहीच घडत नाही. म्हणूनच मी या वर्तमानपत्रात नोकरी करते. त्यामुळे किमान माझा चरितार्थतरी चालतो. याबाबत तुम्ही काही सुचवू शकाल का?’

‘नक्कीच,’ मी उत्तर दिलं. ‘माझा एक मित्र इथं सिंगापूरमध्येच एक वर्ग चालवतो. त्या वर्गात विक्रीच्या कलेचं प्रशिक्षण दिलं जातं. मोठमोठ्या कंपन्यांसाठीही तो त्याचे वर्ग घेतो. मला असं वाटतं, की तू हा अभ्यासक्रम करावा. त्याचा तुला फायदा होईल.’

‘तुम्हाला असं म्हणायचं आहे का, की मी आता त्या वर्गाला जाऊन विक्री कशी करायची हे शिकावं?” ती थोडी आश्चर्यचकित झाली होती आणि रागावलीही होती. मी होकारार्थी मान हलवली.

‘तुम्ही माझी चेष्टा करताय, हो ना?’

मी ‘पुन्हा मान हलवली, ‘यात चुकीचं काय आहे?” मी मागे रेलून बसत विचारलं. ती दुखावल्यासारखी दिसत होती आणि आपल्यामुळे नाही, अशी मी स्वतःचीच समजूत करून घेत होतो. मी तिला मदत करू पाहात होतो; पण काहीतरी वेगळंच घडत होतं. संदर्भ [Rich dad poor dad marathi pdf]

श्रीमंत लोक पैशांसाठी काम करत नाहीत

‘डॅड, श्रीमंत कसं व्हायचं ते मला सांगाल??

माझे डॅड संध्याकाळी आलेलं वर्तमानपत्र वाचत होते. माझा प्रश्न ऐकताच त्यांनी ते खाली ठेवलं आणि विचारलं, ‘पण तुला श्रीमंत का व्हायचं आहे?’ ‘कारण आज जिमीची आई त्यांच्या नव्या कॅडिलॅक गाडीतून त्यांच्या बीच हाउसवर वीकेंडसाठी गेल्या आहेत. जिमीनं त्यांच्यासोबत त्याच्या तीन मित्रांनाही नेलं. फक्त मला आणि माईकला नेलं नाही. आम्ही गरीब असल्यामुळे आम्हाला बोलावलं नाही, असं तो म्हणाला.’

‘म्हणून तुम्हाला नेलं नाही?’ डॅडनं अविश्वासानं विचारलं. ‘हो,’ मी

म्हणालो.

डॅडनं शांतपणे आपलं डोकं हलवलं. खाली घसरलेला चष्मा

परत वर घेतला आणि ते वर्तमानपत्र वाचू लागले. मी त्यांच्या उत्तराची वाट पाहात तसाच उभा होतो. ते वर्ष होतं १९५६. मी नऊ वर्षांचा होतो. काही दैवगतीमुळे मी नेमका श्रीमंत मुलांच्या शाळेत जात होतो. आमच्या गावात प्रामुख्यानं उसाची लागवड केली जायची. वसाहतीतील मॅनेजर्स, डॉक्टर्स, बँकर्स वगैरे श्रीमंत मंडळी आपापल्या मुलांना याच शाळेत पाठवत. आमची शाळा पहिली ते सहावीपर्यंतची होती. सहावीनंतर मुलं खासगी शाळेत जात. मी रस्त्याच्या एका बाजूला राहात असल्यामुळे त्या शाळेत जायचो. राहात असतो, तर माझ्यासारखी सर्वसामान्य मुलं ज्या शाळेत जातात, तिथं गेलो असतो. दुसऱ्या बाजूला सहावीनंतर मी आणि ही मुलं सरकारी शाळा आणि कॉलेजात गेलो असतो. खासगी शाळा आम्हाला परवडणाऱ्याच नव्हत्या.

मी तसाच उभा असल्याचं पाहून डॅडींनी वर्तमानपत्र खाली ठेवलं. तेही विचार करत असावेत. शेवटी हळूवार आवाजात ते म्हणाले, ‘तुला जर श्रीमंत व्हायचं असेल, तर तुला पैसे कसे मिळवावेत, हे शिकावं लागेल.’ ‘मग कसे मिळवू मी पैसे?” मी चटकन विचारलं. ते हसत म्हणाले, ‘डोकं वापर.’

याचा खरा अर्थ होता, मी एवढंच सांगू शकतो किंवा मला माहीत नाही किंवा उगाच काहीतरी प्रश्न विचारू नकोस.

संदर्भ [Rich dad poor dad marathi pdf]

Leave a Comment

https://chat.whatsapp.com/HZP8Y0kWefcAWjdCq65flT