क्रिप्टो करेंसी म्हणजे काय? | What is Crypto Currency in Marathi

Crypto currency in Marathi : क्रिप्टो करेंसी म्हणजे काय? हा प्रश्न बऱ्याच जणांना पडत आहे. आणि काही लोक अशी आहेत जे क्रिप्टो करेंसी मधून लाखो रुपये कमवत आहेत. क्रिप्टो करेंसी मध्ये इन्व्हेस्ट करण्यासाठी क्रिप्टो करेंसी म्हणजे काय? त्यामध्ये गुंतवणूक कसे करायचे, कोणत्या करन्सी मध्ये गुंतवणूक केली पाहिजे, तसेच क्रिप्टो करेंसी मध्ये गुंतवणूक करणे सुरक्षित आहे का. या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला असणे आवश्यक आहे. ह्या पोस्ट मध्ये आपण खरंच विषयी पूर्ण माहिती बघणार आहे.

क्रिप्टो करेंसी म्हणजे काय? | What is Crypto currency in Marathi

क्रिप्टो करेंसी म्हणजे काय ?

क्रिप्टो करेंसी म्हणजे काय हे क्रिप्टो आणि करन्सी या दोन शब्दापासून तयार झालेला एक शब्द म्हणजे क्रिप्टो करेंसी आहे. यामध्ये क्रिप्टो म्हणजेच गुप्त आणि करन्सी म्हणजेच पैसा. म्हणजेच क्र्यप्टॉकरेन्सी म्हणजे गुप्त पैसा. क्रिप्टो करेंसी एक virtual करन्सी आहे किंवा डिजिटल करन्सी आहे. अशी ही करन्सी पैशा सारखी प्रत्यक्ष आपल्या हातात मिळत नाही. किंवा आपण त्याला स्पर्श करू शकत नाही. क्रिप्टो करेंसी एक आभासी चलन आहे हे चलन आपल्याला खरेदी किंवा विक्री करण्यासाठी आपल्याकडे डिजिटल वॉलेट असणे आवश्यक आहे. या करन्सी चा वापर आपण गुंतवणूक म्हणून किंवा वस्तू किंवा सेवा खरेदी करण्यासाठी करू शकतो.

क्रिप्टो करेंसी कसे काम करते |How Crypto currency works in Marathi

क्रिप्टो करन्सी हे ब्लॉक चैन टेक्नोलॉजी वर आधारित आहे. क्रिप्टो करेंसी मध्ये होणारा प्रत्येक व्यवहार ब्लॉकचेन बॉक्समध्ये सेव्ह होतो. ब्लॉकचेन टेक्नॉलॉजीचा वापर केल्यामुळे क्रिप्टो करेंसी मधील व्यवहार इंड टू एंड इन्स्क्रिप्ट राहतात, क्रिप्टो करेंसी मायनिँग केली जाते आणि जे क्रिप्टो करेंसी मायनिंग करतात त्यांना मायनर्स असे म्हटले जाते.

क्रिप्टो करन्सी चे फायदे | Benifits of Crypto currency

  • क्रिप्टो करेंसी एक डिजिटल किंवा व्हर्च्युअल करन्सी असल्यामुळे यामध्ये धोका किंवा फसवणूक होण्याची शक्यता खूप कमी आहे.
  • क्रिप्टो करेंसी चा दुसरा मोठा फायदा हा आहे की आपण क्रिप्टो करेंसी एका देशांमधून दुसऱ्या देशात पाठवू शकतो क्रिप्टो करेंसी ही डिजिटल करन्सी असल्यामुळे याला कोणत्याही भौगोलिक सीमा नाहीत.
 • क्रिप्टो करेंसी ही ब्लॉकचैन टेक्नॉलॉजी वर आधारित असल्यामुळे यामध्ये केलेले ट्रांजेक्शन कोणीही ट्रॅक करू शकत नाही आणि हे ट्रांजेक्शन पूर्णपणे फ्री आहेत यावर कोणतेही चार्जेस लागत नाहीत.
 • क्रिप्टो करेंसी वर कोणाचेही नियंत्रण नाही कोणतेही देशाचे सरकार यावर नियंत्रण करू शकत नाही.

क्रिप्टो करेंसी चे तोटे | Disadvantages of Crypto currency

 • क्रिप्टो करेंसी चा वापर अवैध कामांसाठी केला जाऊ शकतो.
 • जर आपण चुकीचा ट्रांजेक्शन केलं तर ते आपण सुधारू शकत नाही त्यामुळे आपण पाठवत असलेल्या क्रिप्टो करेंसी वॉलेट चा ऍड्रेस बरोबर असणे खूप महत्त्वाचे आहे.
 • क्रिप्टो करेंसी वर कोणत्याही देशाचे किंवा कोणत्याही व्यक्तीचे नियंत्रण नाही.
 • तुमच्याकडे असलेल्या क्रिप्टो करेंसी वॉलेट चा आयडी आणि पासवर्ड जर तुम्ही विसरलात तर तुमचे पूर्ण पैसे गमावून बसू शकता.
 • क्रिप्टो करेंसी खूप जास्त volatile असते.
 • इंटरनॅशनल न्यूज चा परिणाम होऊ शकतो.

 

क्रिप्टो करेंसी ची सुरुवात | Idea of Crypto Currency

क्रिप्टो करेंसी ची सुरुवात 1980 मध्ये झाली, 1980 मध्ये कागदांच्या पैशाला सोबतच डिजिटल करन्सी चा ही वापर केला जाऊ शकतो, यावर विचार सुरू झाला अमेरिकेतील “डेव्हिड चोम” यांनी सर्वात आधी “डिजी कॅश” म्हणून पहिली इंटरनेट किंवा डिजिटल करन्सी ची सुरुवात केली.या क्रिप्टो करेंसी ची लोकप्रियता 1995 1998 मध्ये वाढू लागली डीजी कॅश या क्रिप्टो करेंसी ची खरेदी करण्यासाठी मायक्रोसॉफ्टने 180 मिलियन डॉलर ची ऑफर दिली होती.

क्रिप्टो करेंसी ची लोकप्रियता अजूनच वाढू लागली जेव्हा काही नवीन स्टार्टअप ने खरेदी-विक्रीसाठी क्रिप्टो करेंसी चा वापर करू लागले. करेंसी चे व्यवहार कोणत्याही अडचणी शिवाय होऊ लागले त्यामुळे याच्या लोकप्रियतेमध्ये प्रचंड वाढ होऊ लागली. 2008 मध्ये अमेरिकेत आलेल्या आर्थिक संकटामुळे बँकेत ठेवलेल्या पैशांवर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ लागले आणि त्यातच क्रिप्टो करेंसी चा उदय झाला.

शेअर मार्केट मराठी माहिती | Share Market Information in Marathi

जगामध्ये किती क्रिप्टो करेंसी आहेत |How Much Crypto currency in the world

इन्वेस्टपीडिया च्या एका रिपोर्टनुसार जगामध्ये नऊ हजार पेक्षा जास्त क्रिप्टो करेंसी आहेत. ( जानेवारी 2022 पर्यंत.) 2013 मध्ये एकूण क्रिप्टो करेंसी फक्त 60 होत्या पुढील दोन वर्षात म्हणजेच 2015 पर्यंत क्रिप्टो करेंसी ची संख्या 562 वर झाली. तर 2015 ते 2020 या पाच वर्षांमध्ये क्रिप्टो करेंसी ची संख्या 562 वरून 3900 वर गेली आणि गेल्या एका वर्षात म्हणजेच 2020 ते 2021 मध्ये 1000 पेक्षा जास्त क्रिप्टो करेंसी ची नोंद झाली आहे.

क्रिप्टो करेंसी खरेदी विक्री कशी करायची | How to Buy and Sell Crypto

ज्याप्रकारे शेअर मार्केटमध्ये स्टॉक एक्सचेंज आहेत त्याचप्रमाणे क्रिप्टो करेंसी मध्येही क्रिप्टो एक्सचेंज आहेत. जसे शेअर खरेदी विक्री करण्यासाठी डिमॅट अकाउंट असते त्याचप्रमाणे क्रिप्टो करेंसी खरेदी-विक्री करण्यासाठी क्रिप्टो करेंसी वॉलेट असते.

भारतातील क्रिप्टो करेंसी एक्सचेंज

 • वजीर एक्स ( Wazir X )
 • जेब पे ( jeb pe )
 • कॉइन डीसी एक्स (coin dcx )
 • कॉइन स्विच कुबेर ( coin switch kuber )

क्रिप्टो करेंसी कायदेशीर आहे का |Is Crypto currency Legal

क्रिप्टो करेंसी कायदेशीर आहे की नाही हे उत्तर हो किंवा नाही अशा स्पष्ट शब्दांमध्ये देता येणार नाही. कारण क्रिप्टो करेंसी ही काही देशांमध्ये कायदेशीर आहे तर काही देशांमध्ये बेकायदेशीर आहे म्हणजेच बंद आहे.

क्रिप्टो करेंसी कायदेशीर असलेले देश

 • ऑस्ट्रेलिया ( Australia )
 • युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका ( United States of America )
 • कॅनडा ( Canada )
 • युनायटेड किंगडम (United Kingdom )
 • फिनलँड ( Finland )

या देशांमध्ये क्रिप्टो करेंसी कायदेशीर आहे.

क्रिप्टो करेंसी बेकायदेशीर असलेले देश

 • इंडिया (India )
 • चायना (Chaina )
 • कोलंबिया ( Colombia )

या देशांमध्ये क्रिप्टो करेंसी कायदेशीर नाही.

बिटकॉइन म्हणजे काय? What is Bitcoin

Crypto currency in Marathi

बिटकॉइन हे सर्वात जास्त किंमत असलेली क्रिप्टो करेंसी आहे. बिटकॉइन ची सध्याची किंमत 38,340$ अमेरिकन डॉलर आहे म्हणजेच भारतीय रुपयांमध्ये ही किंमत 28 लाख 72 हजार 566 रुपये आहे बिटको सोबत 2009 मध्ये सतोषी नकामोटे या व्यक्तीने केली होती.

बिटकॉइन च्या व्यवहारामध्ये कोणीही मध्यस्थी नसतो तसेच कोणतीही बँक यामध्ये मध्यस्थी नसते. बिटकॉइन ही सर्वात प्रचलित क्रिप्टो करेंसी आहे.बिटकॉइन ची सुरुवात ज्या संतोशी नाकामोटो ने केली होती तो कोण होता त्याचं खरं नाव काय आहे तू कोणत्या देशाचा रहिवासी आहे हे एक रहस्य आहे. त्याच्याबद्दल कोणतीच माहिती उपलब्ध नाही बिटकॉइन शॉर्टकट मध्ये बीटीसी BTC असेही म्हणतात.

एथेरियम | Etherium

बिटकॉइन नंतर सर्वात जास्त लोकप्रिय क्रिप्टो करेंसी कोणती आहे तर ती म्हणजे इथे एथेरियम. एथेरियम ची व्हॅल्यू दिवसेंदिवस वाढत आहे सगळ्यात जास्त किंमत असलेल्या क्रिप्टो करेंसी मध्ये एथेरियम दुसऱ्या स्थानावर आहे. एथेरियम ची किंमत रुपयांमध्ये दोन लाख सहा हजार एकशे एक 2,06,101 रूपये आहे आणि USD मध्ये 2756$ आहे.

एथेरियम ची सुरुवात 19 वर्षीय Vitalik Buterin मे 2013 मध्ये केली होती. Vitalik कॅनडाचा रहिवासी असून त्यांचा जन्म रशियामध्ये झाला होता.

क्रिप्टो करेंसी विषयी विचारले जाणारे प्रश्न ( FAQ )

क्रिप्टो करेंसी चा अर्थ काय आहे?

उत्तर – क्रिप्टो म्हणजे गुप्त आणि करन्सी म्हणजे पैसे म्हणजेच क्रिप्टो करेंसी चा अर्थ गुप्त पैसे असा होतो. क्रिप्टो करेंसी हि डिजीटल करेंसी असून हे एक आभासी चलन आहे याला आपण स्पर्श करू शकत नाही.

क्रिप्टो करेंसी मध्ये गुंतवणूक कशी करायची?

उत्तर – ज्या प्रकारे आपण शेअर मार्केटमध्ये स्टॉक एक्सचेंज च्या मदतीने गुंतवणूक करतो त्याचप्रमाणे क्रिप्टो करेंसी मध्ये गुंतवणूक करण्यासाठी एक्सचेंज आहेत. त्यामार्फत आपण क्रिप्टो करेंसी मध्ये गुंतवणूक करू शकतो.

Download

बीटकॉईन साठी भारतामध्ये बेस्ट ॲप कोणता आहे?

उत्तर – बिटकॉइन मध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपण भारतामध्ये असलेले वजीर एक्स किंवा जेब पे किंवा कॉइन स्विच कुबेर याचा वापर करू शकतो.

Leave a Comment

https://chat.whatsapp.com/HZP8Y0kWefcAWjdCq65flT