स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय? |Swing Trading Information in Marathi

Swing Trading Information in Marathi – स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो की स्विंग ट्रेडिंग काय असतं ट्रेडिंग कसा केला जातो स्विंग ट्रेडिंग ही काय कन्सेप्ट आहे तर या पोस्टमध्ये आपण स्विंग ट्रेडिंग विषयी पूर्ण माहिती बघणार आहोत.

स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय | Swing Trading Information in Marathi

आपल्याला इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय हे माहिती आहे, आज शेअर खरेदी करायचा आणि आजच विकायचा. तसेच आपल्याला डिलिव्हरी ट्रेडिंग म्हणजे काय हे ही माहिती आहे, आज घेतलेला शेअर दोन दिवसांनी दोन महिन्यांनी किंवा वीस वर्षांनी विकता येतो. परंतु स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय हे बऱ्याच जणांना माहिती नाही स्विंग ट्रेडिंग म्हणजे आज घेतलेला शेअर दोन दिवस दोन आठवडे किंवा दोन महिने पर्यंत ठेवणे म्हणजे स्विंग ट्रेडिंग होय स्विंग ट्रेडिंग लाच आपण शॉर्ट टर्म ट्रेडिंग ही म्हणू शकतो.

स्विंग ट्रेडिंग ही डिलिव्हरी ट्रेडिंग मध्ये येते परंतु डिलिव्हरी ट्रेडिंग आणि स्विंग ट्रेडिंग मध्ये फरक काय आहे तर डिलिव्हरी ट्रेडिंग मध्ये आपण एखादा शेअर जास्त काळ ठेवतो.

  1. Swing Trading Information in Marathi

स्विंग ट्रेडिंग चे उदाहरण | Swing Trading Information in Marathi

उदाहरणार्थ. – एक वर्ष ते दहा वर्ष किंवा वीस वर्ष आणि स्विंग ट्रेडिंग मध्ये आपण तो शेअर कमीत कमी दोन दिवस ते जास्तीत जास्त दोन महिन्यांपर्यंत ठेवतो म्हणजेच जो शेअर शॉर्ट टर्म साठी घेतो त्याला स्विंग ट्रेडिंग म्हणतात.

उदाहरण. – तुम्ही एक शेअर पाचशे रुपयाला घेतला आहे आणि तुमच टार्गेट दोन टक्के किंवा चार टक्के आहे जेव्हा हे टार्गेट पूर्ण होईल, म्हणजेच टार्गेट हिट होईल त्यावेळेस तो शेअर विकून ट्रेड मधून बाहेर पडायचे. तुमच टार्गेट जर दोन दिवसात हिट झाले तरी तो शेअर तुम्ही विकू शकता, दोन आठवडे किंवा दोन महिने तुम्ही टारगेट हिट होईपर्यंत थांबू शकता आणि ज्या वेळेस तुमचे टार्गेट पूर्ण होईल त्यावेळेस ट्रेड मधून एक्झिट करू शकता.

डिव्हिडंड म्हणजे काय? | Dividend Information in Marathi

स्विंग ट्रेडिंग चे महत्व | Importance of Swing Trading

इंट्राडे ट्रेडिंग आणि डिलिव्हरी ट्रेडिंग यांच्यामधील फळी म्हणजे स्विंग ट्रेडिंग आहे. इंट्राडे ट्रेडिंग च्या तुलनेत स्विंग ट्रेडिंग खूप सुरक्षित आहे. जेवढे दिवस आपण शेअर होल्ड करणार आहे तेवढा जास्त आपला विनिंग रेशो वाढणार आहे. कारण जेवढे जास्त दिवस आपण तो शेअर होल्ड करू तेवढे जास्त चान्स आहेत की तो शेअर प्रॉफिट मध्ये जाईल.

इंट्राडे ट्रेडिंग करत असताना जर तो शेअर लॉस मध्ये असेल तर आपण डिप्रेशन मध्ये जातो. आपण निराश राहतो. परंतु स्विंग ट्रेडिंग मध्ये तसं होत नाही आपण घेतलेला शेअर आज जरी लॉस मध्ये असेल तरी उद्या किंवा येणाऱ्या काही काळात तो शेअर प्रॉफिट देणार असतो कारण आपण पूर्ण ऍनॅलिसिस करून तो शेअर खरेदी केलेला असतो.

स्विंग ट्रेडिंग चे फायदे |Benifits of Swing Trading in Marathi

जर तुम्ही स्विंग ट्रेडिंग करत असाल तर तुम्हाला स्विंग ट्रेडिंग चे फायदे आई तोटे काय आहेत हे समजून घेणे खूप गरजेचे आहे, स्विंग ट्रेडिंग चे फायदे आणि तोटे पुढील प्रमाणे.

कमीत कमी रिस्क

स्विंग ट्रेडिंग चा सर्वात पहिला आणि मोठा फायदा म्हणजे लो रिस्क किंवा कमी रिस्क आहे. कारण इंट्राडे मध्ये आपल्याला घेतलेला शेअर आजच विकावा लागतो मग तो शेअर प्रॉफिट मध्ये असो किंवा लॉस मध्ये असो. परंतु स्विंग ट्रेडिंग मध्ये जर तो शेअर लॉस मध्ये असेल तर तो शेअर काही काळ होल्ड करू शकतो. आणि जेव्हा तो शेअर प्रॉफिट मध्ये येईल तेव्हा विकू शकतो. परंतु इंट्राडे ट्रेडिंग मध्ये आपण शेअर विकू शकत नाही आज घेतलेला शेअर आजच विकावा लागतो. यामुळेच ब-याच ट्रेडर्सचे मोठे नुकसान होते.

( इंट्राडे मध्ये आपण घेतलेला शेअर डिलिव्हरी मध्ये कन्व्हर्ट करू शकतो परंतु त्यासाठी पुरेसे पैसे असणे आवश्यक आहे. )

जास्तीत जास्त प्रॉफिट

जेव्हा एखादा शेअर डाऊन ट्रेण्ड मध्ये येतो. तेव्हा तो शेअर ठराविक लेव्हलला सपोर्ट घेऊन पुन्हा वर जातो. इथे जो शेअर वर चालला आहे तो शेअर एका दिवसात वर जात नाही. जेव्हा तो शेअर अप फ्रेंड मध्ये असेल तेव्हा आपण इन्ट्राडे पेक्षा स्विंग ट्रेडिंग मध्ये जास्त प्रॉफिट कमवू शकतो. जोपर्यंत तो शेअर वर चालला आहे तोपर्यंत आपण प्रॉफिट कमवू शकतो आणि जेव्हा आपले टार्गेट पुर्ण होईल तेव्हा तो शेअर आपण विकू शकतो किंवा त्या शेअर चा स्टॉप लॉस ट्रेल करू शकतो.

मर्जिन नाही

स्विंग ट्रेडिंग मध्ये आपल्याला कोणत्याही प्रकारचे मार्जिन मिळत नाही. मार्जिन हे फक्त इंट्राडे मध्ये मिळते margin जर दहापट असेल तर तुम्ही एका शेअरच्या किमतीत दहा शेर घेऊ शकता. परंतु जर लॉस मध्ये गेला तर तो लॉस तुम्ही घेतलेल्या दहा शेर वर होतो. त्यामुळे तुमचे जास्त नुकसान होते परंतु स्विंग ट्रेडिंग मध्ये कोणत्याही प्रकारचे मार्जिन मिळत नाही. जर आपल्याला दहा शेअर पाहिजे असतील तर त्या, दहा शेअर चे जेवढे पैसे होतील ते पूर्ण पैसे देणे भाग आहे. त्यामुळे आपण आवश्यकतेपेक्षा जास्त शेअर घेत नाही आणि त्यामुळे आपले नुकसान ही कमी होते.

 

स्विंग ट्रेडिंग चे तोटे |Disadvantages of Swing Trading marathi

दररोज अपडेट घेणे

तुम्ही जर स्विंग ट्रेडिंग मध्ये एखादा शेअर खरेदी केला आहे. त्यानंतर तुम्ही तुमच्या कामाला लागला आणि दोन तीन दिवसात त्या शेअर बद्दल अचानक एखादी नकारात्मक बातमी आली तर, तो शेअर अचानक खाली जाऊ शकतो. म्हणजे त्याची किंमत अचानक कमी होते आणि आपलं मोठं नुकसान होतं. त्यामुळे आपण घेतलेल्या शेअर बद्दल दररोज माहिती घेतली पाहिजे तो शेअर प्रॉफिट मध्ये आहे कि लोस मध्ये हे डिमॅट अकाउंट मध्ये बघितलं पाहिजे. त्या शेअर बद्दल कोणती बातमी येत आहे याच्याकडे ही लक्ष असलं पाहिजे. त्यामुळे आपलं नुकसान होत नाही.

जास्त पैशांची गरज

स्विंग ट्रेडिंग मध्ये मार्जिन मिळत नाही. त्यामुळे स्विंग ट्रेडिंग साठी जास्त पैशांची आवश्यकता आहे. Margin फक्त इंट्राडे ट्रेडिंगसाठी मिळते. मार्जिन मुळे आपण कमी पैशात जास्त शेअर घेऊ शकतो. मार्जिन नसणे हा ट्रेडिंगचा तोटा आहे.
 

ओवरनाईट होल्डिंग रिस्क

स्विंग ट्रेडिंग मध्ये घेतलेला शेअर आपण एका दिवसापेक्षा जास्त वेळ ठेवू शकतो. तसंच हे आपल्यासाठी रिस्की काम आहे. कारण आपण घेतलेल्या शेअर विषयी काही निगेटिव्ह न्यूज आली तर त्यात आपले नुकसान होऊ शकते तसेच तो शेअर जर दुसऱ्या दिवशी गॅप डाउन ओपन झाला तर त्यातही आपले नुकसान होऊ शकते.

स्विंग ट्रेडिंग साठी काही टिप्स

स्विंग ट्रेडिंग हे नेहमी डाउन ट्रेण्ड संपल्यावर किंवा अप फ्रेंड मध्ये करावे.

सिंग ट्रेडिंग साठी वेगळी स्ट्रॅटेजी बनवावी.

यामध्ये एन्ट्री, एक्झिट, स्टॉप लॉस आणि टारगेट या गोष्टी आधीच ठरवून ठेवाव्यात.

 

निष्कर्ष

आपण या पोस्ट मध्ये स्विंग ट्रेडिंग म्हणजे काय हे बघितलं आहे तसेच आपण स्विंग ट्रेडिंग चे उदाहरण समजून घेत स्विंग ट्रेडिंग विषयी सखोल माहिती घेण्याचा प्रयत्न या पोस्ट मार्फत केला आहे. तसेच या चे फायदे काय आहेत आणि याचे तोटे के आहेत हेही आपण बघितलं आहे, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या पोस्ट ची लिंक तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा.
धन्यवाद…

नेहमी विचारले जाणारे प्रश्न

1] स्विंग ट्रेडिंग कसे करतात?

उत्तर – आपण डिलिव्हरी ट्रेडिंग प्रमाणेच किंवा इंट्रा दे ट्रेडिंग प्रमाणेच स्विंग ट्रेडिंग आपल्या डिमॅट अकाउंट मधून करू शकतो.

2] स्विंग ट्रेडिंग चा महत्वाचा फायदा काय आहे?

उत्तर – शेअर खरेदी केलेल्या दिवशी जरी आपण लॉस मध्ये आलो तरी तो शेअर काही काळ होल्ड करून आपण लॉस भरून काढू शकतो.

हेहि वाचा

शॉर्ट सेलिंग म्हणजे काय | Short Selling information in Marathi

Leave a Comment