शॉर्ट सेलिंग म्हणजे काय | Short Selling information in Marathi

शॉर्ट सेलिंग Short Selling information in Marathi शेअर मार्केट मध्ये आपण पडत्या मार्केट मधेही पैसे कमवू शकतो. याच संकल्पनेला शॉर्ट सेलिंग म्हणतात. शॉर्ट सेलिंग मध्ये आपण आधी शेअर विकतो आणि नंतर खरेदी करतो, तुम्ही विचार असाल की आधी शेअर विकायचा कसा. जो शेअर आपल्याकडे नाही तो शेअर आपण विकणार. तर ही पूर्ण माहिती आपण या पोस्ट मध्ये बघणार आहोत की शॉर्ट सेलिंग म्हणजे काय?

शॉर्ट सेलिंग म्हणजे काय | Short Selling information in Marathi

Short selling information in Marathi

साधारणतः आपण शेअर मार्केट मध्ये जेव्हा मार्केट वर चाललेलं असत तेव्हा आपण शेअर खरेदी करतो आणि जेव्हा मार्केट किंवा शेअर ची किंमत वाढते तेव्हा तो शेअर आपण विकतो. परंतु शॉर्ट सेलिंग मध्ये नेमकं याच्या उलट आहे, शॉर्ट सेलिंग मध्ये शेअर ची किंमत कमी होत असताना किंवा मार्केट पडत असताना आपण प्रॉफिट कमवू शकतो. शॉर्ट सेलिंग मध्ये प्रॉफिट कमावण्यासाठी आपल्याला आधी शेअर विकावा लागतो.
इथे तुम्हाला आस प्रश्न पडेल की जो शेअर आपण खरेदी केला नाही तो शेअर आपण विकणार कसा. आपण शेअर खरेदी न करता ही विकू शकतो ही सुविधा आपल्याला ब्रोकर देतो, यालाच आपण शॉर्ट सेलिंग म्हणतो. शॉर्ट सेलिंग काय आहे हे आपण एका उदाहरणावरून समजून घेऊ.

Short selling in Marathi

शॉर्ट सेलिंग चे उदाहरण | Short selling example in Marathi

तुमच्या मित्राकडे एक मोबाईल आहे, त्याची किंमत दहा हजार रुपये (१०k) तुम्हाला अंदाज आहे की दुपारी दोन वाजेपर्यंत मोबाईलची किंमत कमी होऊन आठ हजार रुपये होईल, आणि तुम्ही मित्राचा मोबाईल मार्केटमध्ये दहा हजारला विकला आणि तुम्हाला जो अंदाज होता की दोन वाजता मोबाईलची किंमत कमी होईल तर तो अंदाज बरोबर ठरला आणि मोबाईलची किंमत 8000 झाली तुमच्याकडे आता दहा हजार आहेत आणि मोबाईल ची किंमत (दुपारी) 2 वाजता आठ हजार रुपये आहे. तर दहा हजार रुपये मधील आठ हजार रुपये देऊन तुम्ही तो मोबाईल परत घेतला आणि तुमच्या मित्राला दिला आता तुमच्याकडे दोन हजार रुपये शिल्लक आहेत आणि तोच तुमचा प्रॉफिट आहे. जो मोबाईल तुमच्याकडे नव्हता तो मोबाईल तुम्ही विकला आणि त्याची किंमत कमी झाल्यावर परत घेतला यालाच शेअर मार्केटमध्ये शॉर्ट सेलिंग म्हणतात.

आपण हेच उदाहरण शेअर मार्केटमधील एका शेअर वरून समजून घेऊ. समजा Tata Motors हा शेअर आहे याची किंमत सध्या पाचशे रुपये आहे, म्हणजेच सकाळी दहा वाजता पाचशे रुपये किंमत आहे आणि तुम्हाला अशी काही बातमी समजली आहे ज्यामुळे टाटा मोटर्स च्या शेअरची किंमत कमी होईल. अशा वेळेस तुम्ही टाटा मोटर्सचे दहा शेअर्स सेल(शॉर्ट सेल) केले, म्हणजे तुम्ही टाटा मोटर्सचे दहा शेअर्स पाचशे रुपयाला सेल केले आणि तुमच्या अंदाजानुसार दुपारी दोन वाजता ती न्युज झाली आणि टाटा मोटर्स च्या शेअरची किंमत कमी होऊन 450 रुपये झाली तुमचा अंदाज खरा ठरला तुम्ही जे टाटा मोटर्स शेअर पाचशे रुपयेला विकले होते तेच शेअर पुन्हा साडेचारशे रुपयाला परत खरेदी केले.

५००-४५०=५०

तुम्हाला एका शेअर मागे पन्नास रुपये प्रॉफिट झाला आणि तुमच्याकडे टाटा मोटर्सचे दहा शेअर्स होते म्हणजेच

१०×५०=५००

तुमचा एकूण प्रॉफिट पाचशे रुपये झाला.

शॉर्ट सेलींग मध्ये तुम्हाला लॉस कसा होऊ शकतो

आता आपण बघूया की शॉर्ट सेलींग मध्ये आपला लॉस कसा होतो. – उदाहरण. आपण टाटा मोटर चे दहा शेअर्स पाचशे रुपये ला सेल केले. जर टाटा मोटर्स च्या शेअर ची किंमत पाचशे रुपये पेक्षा खाली आली तरच आपला प्रॉफिट होईल, परंतु शेअरची किंमत पाचशे रुपयाच्या वर गेली तर आपला लॉस होईल जर पाचशे रुपयाला सेल केलेला शेअर पाचशे पन्नास वर गेला तर आपला एका शेअर मागे पन्नास रुपयाचे नुकसान होईल म्हणजे लॉस होईल.

पण आपण दहा शेअर सेल केले आहेत म्हणजेच आपले नुकसान .

१०×५०=५००

पाचशे रुपये होईल.

Multiple Candlestick Patterns information in Marathi



शॉर्ट सेलींग चे नियम | Short Selling Rules in Marathi

मार्केटमध्ये शॉर्ट सेलींग हे फक्त इंट्राडे मध्येच करता येते. ( डिलिव्हरी मध्ये आपल्याला शॉर्ट सेलींग करता येत नाही.)

आपण शॉर्ट सेल केलेला शेअर तीन वाजेपर्यंत परत खरेदी केला नाही तर तो शहर त्या किमतीला आपोआप खरेदी होतो आणि त्यावरून आपला प्रॉफिट किंवा लॉस ठरतो.

शॉर्ट सेलींग मध्ये आज विकलेला शेअर आजच खरेदी करावा लागतो तो शेअर दुसऱ्या दिवसापर्यंत ठेवता येत नाही.

डेरिव्हेटिव्ह मार्केटमध्ये आपण हा घेतलेला शेअर पुढील एक्सपायरी पर्यंत येऊ शकतो परंतु त्यामध्ये शेअरचे लॉट असतात की आपल्याला सेल करावे लागतात आणि त्यासाठी खूप जास्त पैसे लागतात.

शॉर्ट सेलींग मध्ये लॉस कसा होतो

शॉर्ट सेलींग मध्ये आपल्या लॉस तेव्हा होतो, जेव्हा आपण एखादा शेअर जास्त किमती वर असेल तेव्हा खरेदी करतो आणि जसं की आपला अंदाज असतो शेअरची किंमत कमी होईल पण तसं न होता, त्या शेअरची किंमत वाढते. आपण ज्या किमतीला शेअर खरेदी केला आहे त्याच्यापेक्षा शेअरची किंमत वाढेल तेवढा आपला लॉस होतो. आपण सेल केलेला शेअर आपल्याला परत खरेदी करावाच लागतो. त्याशिवाय आपला ट्रेड कम्प्लीट किंवा पूर्ण होत नाही.

उदाहरण- तुम्ही एसबीआय ( sbi ) हा शेअर 400 रुपये ला सेल केला म्हणजेच शॉर्ट सेल केला. आणि तुमचा अंदाज आहे की या शेअरची किंमत तीनशे पन्नास रुपये होईल, जर एसबीआय शेअरची किंमत 350 रुपये झाली तर आपला प्रॉफिट होईल. परंतु जर एसबीआय ची किंमत 400 वरून 450 वर गेली तर आपला प्रत्येक शेअर मागे पन्नास रुपये नुकसान होईल.

शॉर्ट सेलींग कधी पाहिजे

शॉर्ट सेलींग हे आपण मार्केट चालू असताना कधीही करू शकतो. परंतु आपण आपण शॉर्ट सेलींग चुकीच्या वेळेस केलं तर आपलं मोठं नुकसान होऊ शकतं. शॉर्ट सेलींग करताना मार्केटचा ट्रेंड खूप महत्त्वाचा आहे. शॉर्ट सेलींग हे नेहमी मार्केट पडत असताना किंवा पडत्या मार्केटमध्ये म्हणजेच डाऊन ट्रेंड मध्ये केलं जातं किंवा केलं पाहिजे. आपण जर अप ट्रेण्ड मध्ये शॉर्ट सेलींग केलं तर मार्केट वर जाऊन आपला मोठा लॉस होऊ शकतो. जेव्हा आपल्याला खात्री असेल की मार्केट पडणार आहे तेव्हाच आपण शॉर्ट सेलींग केलं तर आपला प्रॉफिट होतो. जर तुमचं टेक्‍निकल ऍनॅलिसिस चांगल्याप्रकारे माहिती असेल तर. तुम्ही सपोर्ट आणि रेजिस्टन्स लाईन ब्रेक झाल्यावर एन्ट्री घेऊ शकता. शॉर्ट सेलींग मध्ये आपण फक्त सपोर्ट लाईन ब्रेक झाल्यावर म्हणजेच ब्रेक डाऊन झाल्यावर एन्ट्री घेतली पाहिजे.
तसेच आपण न्यूज बेसिसवर सेलिंग करू शकतो. जेव्हा अर्थसंकल्प सादर होणार असतो, तसेच वेगवेगळ्या इवेंट असतात. तेव्हा काही स्टॉक च्या किमती मध्ये मोठी हालचाल बघू शकतो. म्हणजेच काही स्टॉक मोठ्या प्रमाणात पडत असतात. तेव्हा आपण शॉर्ट सेलींग करू शकतो. तसेच जर आपल्याला एखादी अशी बातमी कळाली आहे, ज्यामुळे एखाद्या कंपनीच्या शेअरची किंमत कमी होऊ शकते तेव्हा त्या शेअर मध्ये आपण शॉर्ट सेलींग करू शकतो.

शॉर्ट सेलींग चे फायदे

  • शेअर मार्केटमध्ये होत असलेला लॉस भरून काढण्यासाठी शॉर्ट सेलींग चा म्हणून वापर करू शकतो.
  • पडत्या मार्केटमध्ये नफा कमावण्याचा शॉर्ट सेलींग हा उत्तम पर्याय आहे.
  • शॉर्ट सेलींग इंट्राडे मध्ये होत असल्यामुळे आपण मार्जिन चा वापर करू.

शॉर्ट सेलींग चे नुकसान किंवा तोटे

  • जर आपण सेल केलेल्या शेअरची किंमत कमी होण्याऐवजी वाढायला लागली तर आपला मर्यादित लॉस शकतो.
  • आपण शॉर्ट सेलींग फक्त इंट्राडे ट्रेडिंग मध्येच करू शकतो डिलिव्हरी मध्ये शॉर्ट सेलींग करता येत नाही हा एक शॉर्ट सेलींग चा महत्त्वाचा तोटा आहे.
  • आपण शॉर्ट सेल केलेल्या शेअर ला जर अपर सर्किट लागली तर आपले खूप मोठे नुकसान होत

Download

निष्कर्ष

मित्रांनो या पोस्ट मध्ये आपण बघितलं की शॉर्ट सेलिंग म्हणजे काय असते. शॉर्ट सेलिंग चा उपयोग कशासाठी होतो, कधी होतो, शॉर्ट सेलिंग चे उदाहरण तसेच या मध्ये लॉस कसा होतो. लॉस होऊ नये म्हणून आपण कोणती काळजी घेतली पाहिजे. तसेच शॉर्ट सेलिंग चे फायदे आणि तोटे काय आहेत, ही पूर्ण माहिती आपण बघितली आहे, ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या पोस्ट ची लिंक तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कंमेंट मध्ये नक्की कळवा.

1 thought on “शॉर्ट सेलिंग म्हणजे काय | Short Selling information in Marathi”

Leave a Comment

https://chat.whatsapp.com/HZP8Y0kWefcAWjdCq65flT