Mutual Fund in Marathi: तर मित्रांनो आज आपण या पोस्टमध्ये बघणार आहे म्युचल फंड म्हणजे काय मराठीतून. याचा अर्थ काय होतो, याचा फायदा काय असतो, ही सगळी माहिती आपण या पोस्टमध्ये बघणार आहे. तुम्ही सगळ्यांनी टीव्हीवर जाहिरात बघितली असेल, ज्यामध्ये “म्युचल फंड सही हे” असं सांगितलं जातं. पण खरंच म्युचल फंड सही आहे का? आहे तर कसा आहे आणि नाही तर का नाही हे आपल्याला समजले पाहिजे. फक्त विराट कोहली आणि धोनी सांगतोय म्हणून आपण म्युच्युअल फंडमध्ये इन्वेस्ट केलं पाहिजे का.
म्युचल फंड म्हणजे काय | Mutual fund In Marathi
म्युचल फंड हा शब्द म्युचल आणि फंड या दोन शब्दांपासून बनला आहे. यामध्ये म्युचल या शब्दाचा अर्थ काय आहे तर, जेव्हा एका पेक्षा जास्त लोक एकत्र येतात किंवा एकत्र येऊन काही करतात त्याला म्युचल फंड असे म्हणतात. आणि फंड म्हणजेच पैसा. म्हणजेच जेव्हा एका पेक्षा जास्त लोक एकत्र येऊन एका ठिकाणी पैसे गुंतवणूक करतात त्याला म्युचल फंड असे म्हणतात.
कोणताही मॅच्युअल फंड एक विशिष्ट कंपनी चालवत असते. त्या कंपनीला ए एम सी( AMC )असे म्हणतात. या म्युचल फंड मध्ये आपण पाचशे रुपये ही गुंतवू शकतो. जेव्हा लोक एका पण म्युचल फंड मध्ये पैसे गुंतवतात तेव्हा त्याला असेट अंडर मॅनेजमेंट( asset under management ) म्हणतात. म्युचल फंड ही जी कंपनी चालवते त्या कंपनीला AMC म्हणतात ही कंपनी प्रत्येक म्युचल फंड साठी, म्युचल फंड वर नियंत्रण ठेवण्यासाठी एक मॅनेजर नेमलेला असतो. हा मॅनेजर त्याची टीम बनवून शेअर मार्केटच्या चालू घडामोडींवर लक्ष ठेवतात. म्युचल फंड मध्ये गुंतवणुकीसाठी आलेला पैसा कुठे गुंतवायचा आणि किती गुंतवायचा हे फंड मॅनेजर आणि त्याची टीम ठरवते. त्यामुळे आपण एकदा गुंतवलेले पैसे सुरक्षित ठिकाणी गुंतवायच काम फंड मॅनेजर आणि त्याची टीम करते. त्यासाठी आपल्याला एक ते दोन टक्के फी द्यावी लागते. त्यालाच एक्सपेन्स रेशो ( expense ratio ) असं म्हणतात. कोणत्याही म्युचल फंड मध्ये पैसे गुंतवन्या आधी म्युचल फंड चा एक्सपेन्स रेशो किती आहे ते बघितले पाहिजे. एक्सपेन्स रेशो जेवढा कमी असेल तेवढी आपली बचत होऊ शकते.
म्युचल फंड चे उदाहरण
एक बस आहे, त्या बसमध्ये एकूण 30 आहेत आणि एका सीट ची किंमत शंभर रुपये आहे. तर बस मध्ये एकूण सीट 30 आहेत मग 30 × 100 = 3000 तीन हजार एकूण किंमत तीन हजार रुपये आहे. आपण तीन हजार रुपये देऊन पूर्ण बस मधील सीट घेणे शक्य नाही. मग त्यासाठी आपण शंभर रुपये देऊन एक शीट घेऊ, हे आपल्यासाठी शक्य आहे. तसेच आपण शंभर रुपये देणारे 30 लोक शोधू शकतो.
म्युचल फंड मध्ये किती वर्षे पैसे ठेवले पाहिजेत
म्युचल फंड मध्ये जेवढे जास्त वर्षे पैसे ठेवू तेवढा आपला जास्त प्रॉफिट होण्याची शक्यता असते. म्युचल फंड मध्ये कमीत कमी पाच ते सहा वर्ष गुंतवणूक केली तर चांगला प्रॉफिट मिळू शकतो. आणि या पेक्षा जास्त काळ पैसे ठेवले तर आपला प्रॉफिट अजून जास्त वाढू शकतो. तसेच आपण म्युचल फंड मध्ये टाकलेले पैसे कधीही काढू शकतो.
म्युचल फंड्स चे प्रकार
म्युचल फंड्स चे एकूण सात प्रकार आहेत. ते सर्व प्रकार आपण बघणार आहे परंतु यातील पहिले तीन प्रकार आणि सर्वात महत्वाचे आहेत ते पुढील प्रमाणे
इक्विटी फंड | Equity Funds
इक्विटी फंड ते फंड असतात जे मुख्यतः त्यांचे पैसे विविध कंपन्यांच्या शेअर्समध्ये गुंतवणूक करतात. कारण यामध्ये गुंतवणूक केल्यास जास्त प्रॉफिट होण्याची शक्यता असते. परंतु त्यामुळेच इक्विटी फंड मध्ये रिस्क ही जास्त असते. तुम्ही जर लॉंग टर्म साठी पैसे गुंतवणार असाल, तर इक्विटी फंड हा चांगला पर्याय असू शकतो.
डेट फंड | Debt Funds
डेट फंड मुख्यतः फिक्स इन्कम ( fix income )मध्ये पैसे गुंतवणूक करतात. हा पैसा कंपन्यांच्या डिबेंचर/ कर्जरोखे वर लावला जातो. किंवा सरकारी मालमत्तेवर पैसे लावले जातात. तसेच इतर फिक्स इन्कम सिक्युरिटीज वर हे पैसे लावले जातात. डेट फंड हे जास्त सुरक्षित असतात. हे फंड जास्त सुरक्षित असल्यामुळे इक्विटी फंड पेक्षा डेट फंड मध्ये प्रॉफिट कमी होतो.
हायब्रीड फंड | Hybrid Funds
हायब्रीड फंड मध्ये आपले पैसे थोडे शेअर्समध्ये लावले जातात. आणि थोडे पैसे debenture फंड मध्ये लावले जातात. म्हणजेच काय तर हायब्रीड म्युचल फंड हे आपल्या पैशाला वेगवेगळ्या ठिकाणी विभाजित करून लावते. आणि यामुळेच आपली रिस्क ही कमी होते. हायब्रीड फंड हे इक्विटी फंड आणि डेट फंड यांचे मिळून तयार झालेले आहे.
इंडेक्स फंड | Index Funds
इंडेक्स फंड मध्ये मुख्यता शेअर मार्केटमधील इंडेक्स वर पैसे लावले जातात. जसे की निफ्टी, बँक निफ्टी. जसजसं स्टॉक मार्केट वर जातं किंवा खाली येतं तसंच इंडेक्सी खाली आणि वर जातात. आणि त्याच प्रमाणे आपले पैसे देखील कमी-जास्त होतात. यामध्ये जास्तीत जास्त काम हे इंडेक्स वर अवलंबून असतं. त्यामुळे फंड मॅनेजरला जास्त लक्ष देण्याची आवश्यकता नसते आणि त्यामुळेच इंडेक्स फंड एक्सपेन्स रेशो कमी असतो.
मनी मार्केट फंड | Money Market Fund
मनी मार्केट फंडमध्ये लिक्विड सिक्युरिटीज मध्ये पैसे लावले जातात. ही लिक्विड सिक्युरिटीज म्हणजे ती सिक्युरिटी असते ज्यामध्ये आपण आपले पैसे लगेच काढू शकतो. किंवा आपल्याला पाहिजे तेव्हा आपले पैसे काढू शकतो. मनी मार्केट मध्ये आपले पैसे कमर्शियल पेपर्स आणि ट्रॅजेडी बिल्स यामध्ये लावले जातात. कारण हे सर्वात जास्त लिक्विड असेच आहेत. मनी मार्केट मध्ये शोर्ट टर्म साठी चांगले रिटर्न्स मिळतात.
टॅक्स सेव्हिंग फंडस | Tax Saving Fund
टॅक्स सेव्हिंग फंड मध्ये जास्तीत जास्त पैसे इक्विटी फंड मध्ये लावले जातात. टॅक्स सेविंग फंड चा मुख्य हेतू हा असतो की आपल्या सारख्या इन्वेस्टर चे टॅक्स चे पैसे वाचावेत. सेविंग फंड हा इक्विटी फंड चाच एक भाग आहे.
फंड ऑफ फंड | Funds of Fund
यामध्ये एक म्युचल फंड दुसऱ्या म्युचल फंड मध्ये पैसे लावतात. आणि दुसरे म्युच्युअल फंड ते पैसे त्यांच्या अनुभवानुसार वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवतात. यालाच फंडस् ऑफ फंड असे म्हणतात.
म्युचल फंड्स चे फायदे
- ज्यांना स्टॉक मार्केट विषयी जास्त माहिती नाही ते लोक म्युचल फंड मध्ये इन्व्हेस्ट करू शकतात. म्युचल फंड मध्ये आपण केलेले पैसे तज्ञ लोकांद्वारे शेअर मार्केटमध्ये गुंतवले केले जातात.
- आपण म्युचल फंड मध्ये केले पैसे योग्य ठिकाणी गुंतवणूक करण्यासाठी फंड मॅनेजरची नेमणूक केलेली असते. तसेच फंड मॅनेजर स्वतःची टीम तयार करून हे पैसे गुंतवत असतो.
- म्युचल फंड मध्ये आपण कमीत कमी पैसे गुंतवणूक करू शकतो. म्युचल फंड मध्ये काही कंपन्या आहेत ज्या कंपन्या महिन्याला फक्त एक हजार रुपये गुंतवणूक करण्याची संधी देतात.
- म्युचल फंड मध्ये कोणतेही लपलेले चार्जेस नसतात. आपल्याला पाहिजे ती प्रत्येक गोष्टीची माहिती आपल्याला मिळते.
म्युचल फंड चे तोटे किंवा नुकसान
- म्युचल फंड मधून जास्त पैसे कमवायचे असतील तर त्यासाठी आपली इन्व्हेस्टमेंट जास्त पाहिजे. आणि जास्त काळ पैसे इन्व्हेस्ट केले पाहिजेत.
- म्युचल फंड मध्ये कंपनी जास्त लोकांचे एकत्रित पैसे वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करते. म्युचल फंड कंपनी ला जास्त प्रॉफिट झाला तरी तो प्रॉफिट जास्त लोकांमध्ये वाटला जातो त्यामुळे लोकांचे जास्त प्रॉफिट होत नाही.
- पैशांची रिस्क कोणत्याही ठिकाणी पैसे गुंतवले तरी त्याची थोडी का असेना पण रिस्क असते. तसेच रिस्क पैसे कमी होण्याची असते.
निष्कर्ष
मित्रांनो या पोस्टमध्ये आपण म्युचल फंड विषयी माहिती बघितली आहे. या पोस्ट मध्ये आपण बघितले कि म्युचल फंड काय असतो, म्युचल फंड चे उदाहरण, म्युचल फंड मध्ये किती पैसे आणि किती वेळा साठी पैसे टाकले पाहिजेत. म्युचल फंड चे प्रकार आणि फायदे व तोटे . तसेच म्युचल फंड ची सर्व महत्त्वाची माहिती आपण बघितली आहे. ही सर्व माहिती तुम्हाला आवडली असेल तर या पोस्टची लिंक तुमच्या मित्रांसोबत शेअर करा. आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.