Multiple Candlestick Patterns information in Marathi

Multiple Candlestick Patterns in Marathi : आता पर्यंत आपण सिंगल कॅण्डलस्टिक पॅटर्न बघितले आता आपण मल्टिपल कॅण्डलस्टिक पॅटर्न बघणार आहोत मल्टीपल कॅण्डलस्टिक पॅटर्न मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त कॅन्डल्स मिळून पॅटर्न तयार होतो यामध्ये आपल्याला bullish आणि bearish असे दोन पॅटर्न आहेत ते आपण बघूयाआता पर्यंत आपण सिंगल कॅण्डलस्टिक पॅटर्न बघितले आता आपण मल्टिपल कॅण्डलस्टिक पॅटर्न बघणार आहोत मल्टीपल कॅण्डलस्टिक पॅटर्न  मध्ये दोन किंवा दोन पेक्षा जास्त कॅन्डल्स मिळून पॅटर्न तयार होतो यामध्ये आपल्याला bullish आणि bearish असे दोन पॅटर्न आहेत ते आपण बघूया.

चार्ट मध्ये वेगवेगळ्या कॅन्डलस्टिक पॅटर्न फॉर्म होत असतात तर त्या कँडलेस्तिक पॅटर्न वरून आपण ओळखू शकतो की यानंतरच मार्केट बुलीश असेल बेअरिष असेल आणि त्यावरून आपण ठरवू शकतो की आपल्याला शेअर खरेदी करायचा आहे की विक्री करायचा आहे.

कॅन्डलस्टिक / Candlestick चे वेगवेगळे प्रकार आहेत त्यावरून आपण ठरवू शकतो की पुढील मार्केट कसे असेल. त्यासाठी आपल्याला कॅन्डल स्टिक चे महत्त्वाचे पॅटर्न समजून घेणे आवश्यक आहे.

कॅन्डलस्टिक चे दोन प्रकार आहेत एक सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न आणि दुसरा मल्टिपल कॅन्डलस्टिक पॅटर्न.

सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न | Single Candlestick Pattern in Marathi

सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये पुढील प्रकार आहेत.

Marubozu / मारूबोजू
Spinning Top / स्पिननिंग टॉप
doji / डोजी
Paper Umbrella / पेपर अंब्रेला
Hammer / हॅमर
Hanging Man / हँगिंग मॅन
Shoting Star / शूटिंग स्टार

मल्टिपलं कॅन्डलस्टिक पॅटर्न | Multiple Candlestick Pattern in Marathi

मल्टिपलं कॅन्डलस्टिक पॅटर्न मध्ये पुढील प्रकार आहेत –
Engulfing pattern
Harami Pattern
Morning Star
Evening Star

Engulfing Pattern in Marathi

समोर जो पॅटर्न दिसत आहे त्याला इन Engulfing पॅटर्न असे म्हणतात, यामध्ये एक कॅण्डल दुसऱ्या candle la engulf करते म्हणजेच गिळून टाकते. या पॅटर्नमध्ये दोन प्रकार आहेत bullish engulfing आणि bearish engulfing.

Bullish Engulfing

Bullish engulfing pattern

Bullish engulfing pattern मध्ये रेड कॅण्डल ला ग्रीन कॅण्डल engulf करते म्हणजेच गिळून टाकते.
Bullish engulfing पॅटर्न च्या आधी downtrend असला पाहिजे.
Bullish engulfing पॅटर्नमध्ये पहिली कॅण्डल रेड असते.
यामध्ये दुसरी कॅण्डल ग्रीन असते म्हणजेच bullish असते आणि ती ग्रीन कँडल रेड कॅण्डल ला पूर्णपणे engulf करते म्हणजेच गिळून टाकते.

Bearish Engulfing

Bullish engulfing pattern

Bearish Engulfing pattern : मध्ये ग्रीन कॅण्डल ला रेड कॅण्डल engulf करते.

बियरिष इंगुल्फिंग पॅटर्न च्या आधी Uptrend असला पाहिजे.

Bearish Engulfing पॅटर्न मध्ये पहिली कॅण्डल ग्रीन म्हणजेच bullish असते आणि दुसरी रेड कॅण्डल म्हणजेच bearish Candle असते.

दुसरी candle red असली पाहिजे आणि त्या bearish candle ने ग्रीन Candle la पूर्णपणे engulf केलं पाहिजे म्हणजेच गिळून टाकल पाहिजे all candlestick patterns pdf in marathi.

Harami Pattern in Marathi

harami Candlestick Pattern
हरामी या शब्दाचा अर्थ जो हिंदी मध्ये होते तो नाही, हा जपानी शब्द आहे जपानी भाषेत याचा अर्थ वेगळा होतो.
या पॅटर्न मधेही बेअरिष आणि बुलीश असे दोन पॅटर्न आहेत, हरामी पॅटर्न हा engulfing पॅटर्न च्या उलट दिसतो.

bullish harami pattern in Marathi

bullish harami pattern in Marathi

हा पॅटर्न downtrend मध्ये फॉर्म होतो.
पहिली candle रेड/बेअरिष मोठी candle असते.
दुसरी candle बुलीश candle असते पण लहान असते. या candle ची क्लोज किंमत ही रेड candle च्या ओपन किंमती पेक्षा कमी असते.
बुलीश हरामी पॅटर्न नंतर downtrend संपून uptrend चालू होऊ शकतोया मध्ये पहिली candle दुसऱ्या candle ला enguilf करते.

डिव्हिडंड म्हणजे काय? | Dividend Information in Marathi

Bearish Harami Pattern in Marathi

bullish harami pattern in Marathi

हा पॅटर्न uptrend मध्ये form होतो.
या पॅटर्न मध्ये पहिली candle मोठी ग्रीन candle असते.
दुसरी candle रेड असते आणि ती लहान असते.
दुसऱ्या candle ची ओपन किंमत पहिल्या candle च्या क्लोज किंमती पेक्षा कमी असली पाहिजे.
आणि दुसऱ्या candle ची क्लोज किंमत पहिल्या candle च्या ओपन किअंमती पेक्षा जास्त पाहिजे.

 

Morning Star and Evening। Star Pattern

मॉर्निंग स्टार हा बुलीश कॅडलस्टिक पॅटर्न आहे.
मॉर्निंग स्टार हा downtrend चा reversal पॅटर्न आहे.
मॉर्निंग स्टार च्या आधी downtrend असणे आवश्यक आहे.
मॉर्निंग स्टार पॅटर्न मध्ये 3 candles असतात.
पहिली candle मोठी रेड कॅडले असते, दुसरी कॅडले गॅप डाउन ओपन होते, परंतु ती कॅडले डोजी किंवा स्पिननिंग टॉप candle बनते.
तिसरी कॅडले मोठी ग्रीन candle बनते आणि ती candle पहिल्या candle/रेड च्या ओपन च्या वरती क्लोज होते.

Evening Star Pattern

Evening Star हा बेअरिष पॅटर्न आहे. हा पॅटर्न uptrend चा reversal पॅटर्न आहे. Evening Star पॅटर्न च्या आधी uptrend असणे आवश्यक आहे. या पॅटर्न मध्ये 3 candle असतात.
या मध्ये पहिली candle मोठी / रेड कॅडले असते.
Evening Star पॅटर्न मध्ये दुसरी candle गॅप अप ओपन होते, ती candle डोजी किंवा स्पिननिंग टॉप candle असू शकते.
तिसरी कॅडले मोठी बुलीश candle बनते, ही candle पहिल्या candle च्या ओपन च्या खाली क्लोज होते.

थ्री व्हाईट सोल्जर्स

थ्री व्हाईट सोल्जर्स हा बुलिष कॅन्डल स्टिक पॅटर्न आहे. म्हणजेच थ्री व्हाईट सोल्जर्स हा पॅटर्न बनल्यानंतर मार्केट बुलीश होत किंवा अप ट्रेण्ड मध्ये जात. हा पॅटर्न ट्रेंड चेंज करून बुलिश ट्रेंड मध्ये जातो. हा जपानी पॅटर्न असून यामध्ये तीन पांढरे सैनिक असतात. हे सैनिक वरच्या दिशेने उभे आहेत असं दिसतं म्हणूनच त्याला तीन पांढरे सैनिक असं नाव दिलं आहे. आता आपण बघूया की हा पॅटर्न कसा शोधायचा. या पॅटर्नमध्ये तीन कॅण्डल असतात आणि तीनही कॅन्डल्स हिरव्या म्हणजेच बूलिष कॅडल असतात. या तीनही कॅन्डल्सला अपर शाडो नसते किंवा लोअर शाडो नसते किंवा खूपच कमी असते किंवा या कॅण्डल ला मरुबोझु कॅण्डल म्हणू शकतो. तसेच प्रत्येक कॅन्डल चा हाय हा वरच्या दिशेने असतो. म्हणजेच अप ट्रेंड मध्ये असतो. पहिल्या कॅन्डल च्या हाय पेक्षा दुसऱ्या कॅन्डल्स हाई मोठा असतो. आणि दुसऱ्या कॅन्डल च्या हाय पेक्षा तिसऱ्या कॅन्डल्स चा हाई अजून मोठा असतो. यामध्ये दुसरी कॅण्डल पहिल्या कॅन्डल चा लो ब्रेक करत नाही. तसेच तिसरी कँडल दुसऱ्या कॅण्डल चा लो ब्रेक करत नाही.

थ्री व्हाईट सोल्जर्स मध्ये ट्रेड कसा करायचा
जेव्हां मार्केट डाउन ट्रेंड मध्ये असेल आणि तेव्हा जर आपल्याला फ्री फाईट सोल्जर्स हा पॅटर्न दिसला तरच आपण तो शेअर खरेदी करायचा आहे. किंवा त्यामध्ये इंट्री घ्यायची आहे. तसेच या पॅटर्न मधील तीन ग्रीन कँडल नंतर, जी असेल ती कॅण्डल गॅप अप ओपन झाली पाहिजे. आणि जेव्हा गॅप अप ओपन होईल तेव्हा आपण तिथे फ्रेश एन्ट्री घेऊ शकतो. आणि जोपर्यंत रिव्हर्स कँडल दिसत नाही, तोपर्यंत आपण पोझिशन होल्ड करू शकतो.

पिअर्सिंग लाईन कॅण्डल

पिअर्सिंग लाईन हा बुलिश पॅटर्न आहे. आणि हा पॅटर्न बुलिश Engulfing पॅटर्न सारखा आहे. परंतू पिअर्सिंग आणि इंगुल्फिंग पॅटर्न यामध्ये थोडासा फरक आहे. पिर्सिंग पॅटर्न हा एक बूलिष रिव्हर्स पॅटर्न आहे. म्हणजेच जेव्हा मार्केट जास्त काळ डाउन ट्रेंडमध्ये चालू असते, तेव्हा आपल्याला एक bullish रिव्हर्स पॅटर्न बघायचा असतो, तो पॅटर्न पिअर्सिंग पॅटर्न असू शकतो.
पिअर्सिंग पॅटर्न मध्ये दोन कॅण्डल असतात. यामध्ये पहिली कॅण्डल रेड Candle असते आणि दुसरी कॅण्डल ग्रीन कॅण्डल असते. यामध्ये दुसरी कॅण्डल गॅप डाउन ओपन होते. आणि त्यानंतर अचानक शेअर खरेदी करणाऱ्यांची संख्या वाढते, आणि बायर्स या शेअरच्या किमती वर घेऊन जातात. या पॅटर्नमध्ये पहिली रेड कॅण्डल असते आणि दुसरी ग्रीन कँडल असते. ग्रीन candle म्हणजेच bullish candle पहिल्या रेड Candle च्या 50% च्या वर क्लोज होते. यालाच पिअर्सिंग पॅटर्न म्हणतात. जर दुसरी कॅण्डल पहिल्या कॅण्डल ला पूर्णपणे म्हणजेच शंभर टक्के पेक्षा जास्त क्लोज करत असेल तर त्याला Engulfing पॅटर्न म्हणतात.
पिअर्सिंग पॅटर्न पेक्षा engulfing पॅटर्न जास्त स्ट्राँग सिग्नल देतो. त्यामुळे पिअर्सिंग पॅटर्न पेक्षा engulfing पॅटर्नवर जास्त भरोसा करू शकतो. असे असले तरीही आपण पिर्सिंग पॅटर्न कडे दुर्लक्ष करू शकत नाही.

निष्कर्ष

या पोस्ट मध्ये आपण बघितले की आपण मुल्टिपल कॅडलेस्टिक पॅटर्न चा उपयोग कसा केला जातो तसेच मुल्टिपल कॅडलेस्टिक पॅटर्न काय आसतो. या पॅटर्न चा उपोयग करून आपण चांगला प्रॉफिट करू शकतो, परंतु या साठी आपल्याला प्रत्येक पॅटर्न चे बॅकटेस्ट करणे अतिशय महत्वाचे आहे.

Leave a Comment

https://chat.whatsapp.com/HZP8Y0kWefcAWjdCq65flT