IPO म्हणजे काय? | IPO Information in Marathi

IPO information in Marathi : IPO म्हणजे काय? त्याचा उपयोग काय असतो. IPO मध्ये इनवेस्ट का करतात आणि कसे करतात. या सगळ्या गोष्टींची माहिती आपण या पोस्टमध्ये बघणार आहोत.

IPO म्हणजे काय | IPO information in Marathi

आयपीओ म्हणजे “इनिशियल पब्लिक ऑफर” यालाच ipo म्हणतात ipo काय असतो हे आपण एका उदाहरणातून समजून घेऊ.

उदाहरण – समजा PRECISION या कंपनीला एक हजार कोटींची गरज आहे, कंपनी एक हजार कोटींची गरज पूर्ण करण्यासाठी कंपनी शेअर्स ipo द्वारे शेअर्स विक्री साठी काढते. आपण त्या कंपनीच्या शेअर्स च्या बदल्यात कंपनीला पैसे देतो आणि आपण घेतलेल्या शेअर्स नुसार कंपनीमध्ये मालक होतो आपण घेतलेल्या शेअरची किंमत जेव्हा वाढेल तेव्हा आपल्याला त्यातून फायदा होतो.

उदाहरण. – तुम्ही एखादा शेअर एक हजार रुपयाला घेतला आणि त्याची किंमत वाढून एक हजार पाचशे रुपये झाली. तर प्रत्येक शेअर मागे आपला पाचशे रुपये चा प्रॉफिट होतो. तसेच आपण त्या कंपनी मध्ये काही प्रमाणात मालक झालेलो असतो. त्यामुळे जसा कंपनीला फायदा होईल तसाच आपल्याला फायदा होतो. कारण कंपनीला झालेल्या फायद्यामुळे कंपनीच्या शेअर च्या किमतीमध्ये वाढ होते.

तसेच आपण ज्या कंपनीचे शेअर घेतले आहेत ती कंपनी डिव्हिडंड देते आणि त्या मधूनही आपला चांगला प्रॉफिट होतो.

कंपनी IPO का लॉन्च करते

कंपनीला जेव्हा पैशांची गरज असते तेव्हा कंपनी ipo मार्फत पैसे जमा करते. आता आपण बघूया की कोणत्याही कंपनीला पैसे जमा करण्याची गरज का पडते आणि ते पैसे कंपनी कसे जमवते.

कंपनीला जेव्हा पैशांची गरज असते, तेव्हा ती कंपनी कंपनीचे शेअर्स विकून पैसे जमा करते. हे पैसे का जमा करते, तर कंपनीवर जे काही कर्ज आहे ते कर्जाचे पैसे देण्यासाठी किंवा काही प्रमाणात कर्ज कमी करण्यासाठी या पैशांचा वापर करते.

तसेच कंपनीला नवीन प्रॉडक्ट बनवायचा असेल, किंवा एखादा नवीन प्लांट चालू करायचा असेल, किंवा एखाद्या वस्तूचे प्रोडक्शन वाढवायचे असेल, तसेच एखादी नवीन सर्विस चालू करायचे असेल, तर यासाठी ipo मधून पैसे जमा केले जातात.

 

IPO मध्ये पैसे कसे इन्वेस्ट करायचे

Ipo मध्ये पैसे इन्वेस्ट करण्याची एकदम सोपी पद्धत आहे. त्यासाठी आपण आपल्या डिमॅट अकाउंट मधून, ipo मध्ये पैसे गुंतवू शकतो. डिमॅट अकाउंट साठी आपले वय 18 वर्षे पूर्ण असले पाहिजे, तसेच आपल्याकडे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँक अकाउंट असणे आवश्यक आहे. तुम्ही Upstox वर आपले डिमॅट अकाउंट अगदी सहज आणि मोफत ओपन करू शकता.

IPO विषयी महत्त्वाच्या तारखा

IPO information in Marathi

वरती जो फोटो आहे त्यामध्ये जी कंपनी आहे या कंपनीने आयपीओ लॉन्च केला आहे.

कंपनीने ipo लॉन्च केला आहे. यामध्ये कंपनीने कॉन्टिटी म्हणजेच लॉट साइज ही 2000 ठेवली आहे. म्हणजेच आपण कंपनीच्या एका शेअर साठी अप्लाय करू शकत नाही. कंपनीने ठरवून दिलेल्या लॉटमध्ये आपन शेअर खरेदी करू शकतो. या कंपनीने लॉट साइज ही 2000 ठेवली आहे, आणि एका शेअरची किंमत 51 रुपये आहे म्हणजेच.

२०००×५१=१०२०००

म्हणजेच अपल्याला PRECISION या कंपनीचा ipo द्यायचा असेल तर आपल्याकडे १,०२,००० लागतील.

Ipo start date

PRECISION या कंपनी ने ipo ची ऑफर 19 जानेवारी 2022 रोजी चालू केले आहे, आणि ही ऑफर 24 जानेवारी 2022 पर्यंत चालू राहील. म्हणजेच ज्यांना PRECISION कंपनी चा ipo घ्यायचा आहे त्यांनी 19 ते 24 या तारखे मध्ये घ्यावा लागेल.

Allotment Finalisation

28 जानेवारी 2022 ही अलॉटमेंट Finalisation डेट आहे. म्हणजेच ज्यांना या कंपनीचा आयपीएल भेटला आहे. त्यांची यादी या दिवशी जाहीर होते, जर कंपनीने काढलेल्या एकूण शेअर पेक्षा कमी लोकांनी आयपीओ साठी apply केला, तर सगळ्यांना ipo मिळतो परंतु कंपनीने विक्रीसाठी काढलेल्या शेअर्स पेक्षा जास्त लोकांनी, apply केला तर लकी ड्रॉ द्वारे त्यांचे नाव निघेल त्यांनाच ipo दिला जातो. अलॉटमेंट मध्ये ज्यांची नावे येतात त्यांची कंपनी यादी बनवते आणि ती जाहीर करते.

Refund initiation

23 January 2022 ही रिफंड डेट आहे. जर या कंपनीचा ipo एकूण विक्रीसाठी काढलेल्या शेअर्स पेक्षा जास्त लोकांनी, apply केल्यानंतर ज्यांना लकी ड्रॉ द्वारे ipo भेटत नाही. त्यांना त्यांचे पैसे रिफंड डेट, या दिवशी त्यांच्या डिमॅट अकाउंट ला जी बँक लिंक आहे, त्या बँक अकाऊंट मध्ये ट्रान्सफर केले जातात.

Demat Account transfer

01 फेब्रुवारी 2022 या तारखेला ज्यांना ipo भेटला आहे. त्यांना त्यांच्या डिमॅट अकाउंट मध्ये लॉट नुसार शेअर ट्रान्सफर केले जातात. हे शेअर आपण डिमॅट अकाउंट च्या होल्डिंग मध्ये बघू शकतो.

Listing date

2 फेब्रुवारी 2022 ही या कंपनीची लिस्ट डेट आहे. म्हणजेच या तारखेला कंपनी मार्केटमध्ये लिस्ट होते, आणि याच तारखेपासून ज्यांना ipo भेटला आहे, त्यांच्यासोबतच सर्वजण या कंपनीमध्ये ट्रेडिंग करू शकतात किंवा इन्व्हेस्टिंग करू शकतात यालाच लिस्ट डेट किंवा लिस्टिंग डे म्हणतात.

टॉप 5 ipo इन 2021

पारस डिफेन्स – पारस डिफेन्स हा ipo एक ऑक्टोबर 2021 ला आला होता. पारस डिफेन्स चा IPO ची इशू साईज 170 करोड रुपये ठेवली होती. या आयपीओ ने लिस्टिंग च्या दिवशी 170 टक्के परतावा दिला होता.

सिगाची इंडस्ट्रीज – सिगाची इंडस्ट्रीज कंपनी चा ipo 15 नोव्हेंबर 2021 ला आला होता. ज्या दिवशी आयपीओ स्टॉक एक्सचेंज वर लिस्ट झाला तेव्हा गुंतवणूकदारांना [दोनशे पन्नास] 250% टक्के परतावा मिळाला होता. या सिगाची इंडस्ट्रीज ipo मध्ये शेअर ची किंमत 161 रुपये होती. सिगाची इंडस्ट्रीज च्या आयपीओ ची शेअर प्राईस 161 रुपये होती आणि इशू साईज 125 करोड रुपये होती.

Nayka – Nayka ipo ने गुंतवणूकदारांना चांगला परतावा दिला होता. हा शेअर स्टॉक एक्सचेंज वर 10 नोव्हेंबर 2021 ला लिस्टिंग झाला होता. लिस्टिंग दिवशी गुंतवणूकदारांना 80 टक्के परतावा नायकाच्या आयपीओ ने दिला होता.

Latent view – Latent view हा ipo 2021 मध्ये आला होता. या आयपीओ ने स्टॉक एक्सचेंज वर 23 नोव्हेंबर 2019 रोजी लिस्टिंग झाला होता. या ipo ची इशू साईज 1023 करोड रुपये होती. या ipo ने लिस्टिंग च्या दिवशी 160 टक्के परतावा गुंतवणूकदारांना दिला होता.

झोमॅटो – झोमॅटो हा आयपीओ 23 जुलै 2021 ला स्टॉक एक्सचेंज ऑफर लिस्ट झाला होता. बरेच गुंतवणूकदार या ipo ची वाट बघत होते. तसेच ज्या दिवशी हा आयपीओ लिस्ट झाला त्यादिवशी गुंतवणूकदारांना 52 टक्के परतावा मिळाला होता. झोमॅटो या ipo ची इशू साईज 9375 करोड रुपये होती.

2022 मध्ये येणारे ipo

एल आय सी (LIC) – या आयपीओ ची प्रतीक्षा बऱ्याच जणांना आहे. तज्ञांच्या मतानुसार हा आयपीओ जुलै 2022 पर्यंत येऊ शकतो. एलआयसी ही सरकारी कंपनी असून या आय पी ओ मधून 700 ते 800 करोड रुपये जमा करण्याचे नियोजन आहे. या ipo मध्ये 10 टक्के पर्यंत सरकारी हिस्सा विकला जाणार आहे.

ओला(OLA) – ओला या कंपनीचा आयपीओ 2022 मध्ये येणार आहे. या IPO मार्फत कंपनी पंधरा हजार करोड पर्यंत पैसे जमवणार आहे. या कंपनीने 2020 – 21 मध्ये 800 कोटी पर्यंत नफा कमावला आहे

डेलीव्हेरी – डेलीव्हेरी हा IPO 2022 मध्ये येणार आहे. ही कंपनी IPO मार्फत 3500 करोड रुपये जमा होणार आहे. या कंपनीने आपल्या प्रतिस्पर्धी कंपनीमधील 100% हिस्सा खरेदी केला आहे.

निष्कर्ष

मित्रांनो आपण या पोस्ट मध्ये बघितलं की ipo म्हणजे काय असतो, कोणतीही कंपनी ipo का लाँच करते, आपण ipo मध्ये कसे पैसे गुंतवू शकतो तसेच ipo विषयी महत्वाच्या तारखा कोणत्या असतात, त्याचे के अर्थ आहे, आतापर्यंतचे सर्वात मोठे ipo कोणते आहेत. आणि 2022 या वर्षी कोणते ipo येणार आहेत या सर्व गोष्टी आपण पोस्ट मध्ये बघितल्या आहेत, तुम्हाला जर ही पोस्ट आवडली असेल तर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कंमेंट मध्ये नक्की कळवा आणि या पोस्ट ची लिंक तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.
धन्यवाद…..

हेही वाचा :

डिव्हिडंड म्हणजे काय? | Dividend Information in Marathi

डिव्हिडंड विषयी पुर्ण माहिती मराठीतून

 

Leave a Comment

डिव्हिडंड विषयी पुर्ण माहिती मराठीतून शेअर मार्केट पूर्ण माहिती मराठीतून Money Heist – Tokyo bio, age, hight, income, boyfriend.
https://chat.whatsapp.com/HZP8Y0kWefcAWjdCq65flT