नवीन व्यवसाय कसा चालू करायचा? | How to start a Business in Marathi

नवीन व्यवसाय कसा चालू करायचा (How to start a Business in Marathi) :  स्वतःचा व्यवसाय करावा हे प्रत्येकाचं स्वप्न असतं काही जण प्रत्यक्ष व्यवसाय करत आहेत तर काही जण व्यवसाय करण्याचा विचार करत आहेत आणि काही जण असे आहेत जे व्यवसायात अपयशी झाले आहेत.

ज्या व्यक्ती व्यवसायात अपयशी झाले आहेत त्यांच्यासाठी तसेच ज्यांना व्यवसाय चालू करायचा आहे त्यांच्यासाठी आपण या पोस्टच्या माध्यमातून बघणार आहे की कोणताही व्यवसाय सुरु करण्या अगोदर आपण कोणती काळजी घेतली पाहिजे तसेच आपण व्यवसायात कोणत्या चुका न करणे गरजेचे आहे.

या पोस्टमध्ये दिलेली माहिती नक्कीच तुमच्या उपयोगी येईल खाली दिलेल्या गोष्टी वर योग्य प्रकारे दखल घेऊन तुमचा व्यवसाय चालू करू शकतात.

व्यासायासाठी भांडवल |Capital For new Business

नवीन व्यवसाय कसा चालू करायचा

 

कोणताही व्यवसाय किंवा बिझनेस सुरू करण्यासाठी पहिल्यांदा भांडवल म्हणजेच कॅपिटल ची गरज असते भांडवल नसेल तर कोणताही व्यवसाय सुरु करता येत नाही त्यामुळे व्यवसायातील पहिला टप्पा म्हणजे भांडवल होईल जेवढे भांडवल आपले आपल्याकडे जास्त असेल तेवढा व्यवसाय चांगला व उत्कृष्ट करता येतो भांडवल गोळा करण्यासाठी समभागांची विक्री करून किंवा बँकेकडून कर्ज घेऊन तसेच इतर अनेक मार्गांनी भांडवल गोळा करता येईल.

व्यवसायासाठी जागा | Land for Business

भांडवलाची व्यवस्था झाल्यानंतर व्यवसाय स्थापन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जागेची आवश्यकता असते आपल्या वसायला जेवढी जागा आवश्यक आहे तेवढी जागा असणे गरजेचे आहे व्यवसायाची जागा निश्चित करताना ती जागा अशा ठिकाणी घ्यावी लागेल की ज्या ठिकाणाहून वस्तूंचे वितरण म्हणजेच विक्री किंवा सेल करणे सोपे होईल त्याच प्रमाणे ग्राहकांना देखील सोयीचे आणि सोपे ठरेल.

वस्तू निश्चिती | Product Selection

भांडवली व जागेची व्यवस्था झाल्यानंतर आपण अशा वस्तूचे उत्पादन केले पाहिजे की जी वस्तू बाजारपेठेमध्ये नवीन व स्वतःची असेल व सर्व प्रकारच्या ग्राहकांना ती वस्तू परवडेल त्याचप्रमाणे ती वस्तु ग्राहकांच्या दैनंदिन जीवनासाठी उपयुक्त असेल वस्तूला पूरक कृषी बाजारपेठ मिळाली पाहिजे किंवा उपलब्ध होईल या दृष्टीने आपण वस्तू निश्चिती करण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

कच्चामाल | Raw Material

कोणत्याही वस्तूचे उत्पादन करण्यासाठी आपल्याला सर्वात महत्त्वाचा लागणारा कच्चामाल असतो हा कच्चामाल आपल्याला योग्य बाजारपेठेत योग्य किमतीत मिळाला पाहिजे उत्पादनासाठी वस्तू निश्चित केल्यानंतर आपण त्या वस्तूच्या उत्पादनासाठी जो कच्चामाल आवश्यक आहे त्याची खरेदी करावी लागेल हा कच्चा माल खरेदी करताना योग्य दर्जा बघितला पाहिजे तसेच त्याची किंमत ही योग्य पाहिजे आणि त्याची खरेदी योग्य वेळेला करणे गरजेचे आहे त्यासाठी पूरक पैसे आपल्याकडे असले पाहिजेत.

कामगार किंवा कर्मचारी | Salesman or Workers

आपण सुरू केलेला व्यवसाय साठी कोणती वस्तू बनवण्यासाठी किंवा वस्तूचे उत्पादन करण्यासाठी आपल्याला काम कामगारांची आवश्यकता लागते आपण आपल्या व्यवसायानुसार आवश्यक त्या तज्ञ कामगारांची निवड केली पाहिजे आपण सुरुवातीला जेवढे कामगार गरजेचे आहेत तेवढेच कामगार ठेवले पाहिजेत ज्यामुळे आपले त्यांना देण्याचे वेतन वाचू शकेल तसेच त्या कामगारांना चांगले प्रशिक्षण देणे गरजेचे आहे तसेच आपण जे कामगार निवडणार आहे त्यांना त्या कामातला अनुभव असलेला पाहिजे याची काळजी आपण घेतली पाहिजे या कामगारांसाठी विविध कार्यक्रम राबवू शकतो ज्यामुळे ते आपले काम चांगल्या पद्धतीने करू शकतील व चांगल्या दर्जाचा आणि एक्सपोर्ट कॉलिटी वस्तू तयार होईल.

यंत्रसामग्री | Machinery

कोणत्याही वस्तूचे उत्पादन करण्यासाठी वेगवेगळ्या यंत्रांची गरज असते किंवा मशीनची गरज असते त्यासाठी आपण योग्य त्या ठिकाणाहून चांगल्या दर्जाची यंत्रसामग्री खरेदी केली पाहिजे ज्यामुळे आपल्या उत्पादन मोठ्या प्रमाणावर होईल व आपली वस्तू अतिशय उत्कृष्टरित्या तयार होईल.

मुद्री करण बोधचिन्ह | Logo or Branding

बोधचिन्हा मुळे वस्तूला एक स्वतःचं अस्तित्व प्राप्त होतं यामुळे आपली वस्तू ची विक्री तुलनेत चांगली होते तसेच आपली वस्तू ग्राहकांना सहजरित्या ओळखता येते त्यासाठी आपला लोगो किंवा आपलं बोधचिन्ह करणे गरजेचा आहे. तसेच आपल्या वस्तुच्या लोगो मुळे त्या वस्तूची जाहिरात करणे सोपे जाते त्यामुळे आपण स्पर्धेत टिकून राहू शकतो यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारचा लोगो बनवणे गरजेचे आहे.

जाहिरात | Advertising

बोधचिन्ह किंवा लोगो दिल्यानंतर आपल्याला आपल्या उत्पादित वस्तूची विक्री होण्यासाठी चांगल्या प्रकारे जाहिरात करणं गरजेचे आहे जर जाहिरात आपण केली नाही तर वस्तूची माहिती ग्राहकांना होणार नाही त्यामुळे जाहिरात करणे आवश्यक आहे जाहिरातीची अनेक साधने उपलब्ध आहेत त्यापैकी आपण कोणत्याही चांगल्या साधनांची निवड करून आपल्या वस्तूची जाहिरात चांगली आणि प्रभावी करू शकतो ज्यामुळे ग्राहक आपल्या वस्तू कडे आकर्षित होतील सध्या आपण ऑफलाइन आणि ऑनलाईन जाहिरात करू शकतो ऑनलाईन मध्ये आपण फेसबुक, व्हॉट्सऍप, इंस्टाग्राम, युट्युब ( Facebook, whatsapp, instagram, youtube ) यांसारख्या सोशल मीडियावर जाहिरात करू शकतो.

बांधणी किंवा कव्हर | Cover or Rapper

आपली वस्तू सुरक्षित राहावी व आकर्षक दिसावी यासाठी त्या वस्तूला चांगल्या प्रकारे कवर करणे गरजेचे आहे आपली वस्तू साठवणूक करताना किंवा वाहतूक करताना आपल्या वस्तूचे नुकसान होणार नाही यासाठी आपल्या वस्तूची बांधणी किंवा संवेष्टन करणे गरजेचे आहे.

वस्तूच्या कव्हर मुळे आपली वस्तू आकर्षक दिसते तसेच आपल्या वस्तूची जाहिरात ही आपोआप होते त्याच प्रमाणे आपल्या वस्तूच्या मार्केटिंग मध्ये ागणार्‍या खर्चात बचत होते यामुळे आपल्या वस्तूचे स्वतंत्र अस्तित्व निर्माण होते.

बाजारपेठ संशोधन | Market analysis related our Product

आपण उत्पादित केलेल्या वस्तूंला योग्य बाजारपेठ शोधणं आवश्यक आहे बाजारपेठेची वेगवेगळे प्रकार पडतात त्या बाजारपेठांचे संशोधन करून तसेच बाजारपेठ यांच्या विविध पद्धतीनुसार योजना आखून त्याचा आराखडा बनवून योग्यप्रकारे निरीक्षण केल्यानंतर आपण आपल्या वस्तूला आकर्षक कव्हर केल्यानंतर तसेच वस्तूची योग्यप्रकारे जाहिरात केल्यानंतर त्या वस्तू ला त्या वस्तूच्या प्रकारानुसार योग्य त्या बाजारपेठेत विक्री करणे गरजेचे आहे.

युट्युब वरून पैसे कसे कमवायचे | How to Make Money from YouTube in Marathi in 2022

वस्तूचा दर्जा | Quality of Product

नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी भांडवल जागा वस्तू कच्चामाल कर्मचारी व तसेच अनेक गोष्टींची आवश्यकता असते ही गरज पूर्ण झाल्यानंतर वस्तूचे उत्पादन करण्यासाठी कच्चामाल लागतो जर आपल्या मालाचा दर्जा उत्तम असेल किंवा चांगला असेल तर आपल्याला योग्य बाजारपेठेत योग्य ग्राहक मिळतो.

यासाठी वस्तूचे उत्पादन करण्यासाठी योग्य दर्जाचा कच्चामाल वापरणे गरजेचे आहे तो कच्चामाल खरेदी करताना चांगल्या प्रकारचा चांगल्या प्रतीचा व चांगल्या दर्जाचा असावा याची काळजी आपण घेतली पाहिजे आपल्या वस्तू साठी लागणाऱ्या कच्चामाल योग्य बाजारपेठेतून योग्य किमतीला खरेदी करणे आवश्यक आहे तसेच आपल्या वस्तूचे प्रमाणीकरण व प्रतवारी करणे जेणेकरून वस्तूच्या दर्जा चांगला राखता येईल.

वस्तूची योग्य किंमत | Price of our Product

आपण उत्पादित केलेल्या वस्तू साठी लागणाऱ्या कच्च्या मालाची योग्य दर्जा व किंमत बघून खरेदी केल्यानंतर त्या कच्चा मालावर आपल्या उत्पादित वस्तूची किंमत अवलंबून असते.

जर आपण कच्चामाल (Raw Material) खरेदी करण्यासाठी जास्त पैसे लावले तर आपल्या वस्तूची किंमतही जास्त होईल आणि तुलनेने वस्तूची विक्री कमी होईल आपल्या व्यवसायाचा नफा उत्पादित वस्तूंच्या किमतीवर अवलंबून असतो त्यामुळे आपण आपल्या वस्तूची योग्य किंमत ठरवणे अतिशय महत्वाचे आहे.

या वस्तूंचा किंवा सेवांचा व्यवसाय तुम्ही सुरू करू शकता

मेडिकल स्टोअर | Medical Store

मेडिकल स्टोर (Medical Store) हा सर्वात जास्त चालणारा आणि कधी बंद न पडणारा व्यवसाय आहे हा व्यवसाय तुम्ही गावात किंवा शहरात चालू करू शकता यासाठी तुम्हाला योग्य ते शिक्षण घेणे गरजेचे आहे तसेच मेडिकल स्टोअर चालू करण्यासाठी तुमच्याकडे दोन ते सहा लाखांपर्यंत भांडवल असणे आवश्यक आहे.

मोबाईल रिपेरिंग | Mobile Repairing

सध्याच्या काळात प्रत्येकाकडे मोबाईल (Mobile) आहे. मोबाईल शिवाय जगण्याचा विचारही कोणी करू शकत नाही मोबाईल ही इलेक्ट्रॉनिक (Electronic) वस्तू असल्यामुळे त्यामध्ये बिघाड हि होतात तो दुरुस्त करण्याचा व्यवसाय इ तुम्ही चालू करू शकता यासाठी तुम्हाला मोबाईल रिपेरिंग चा कोर्स करावा लागेल आणि तुमच्याकडे एक ते पाच लाख रूपये भांडवल असणे आवश्यक आहे.

किराणा शॉप | Kiarana Shopee

किराणा शॉप आयुष्यभर चालणारा व्यवसाय आहे हा व्यवसाय गाव किंवा शहरात चांगला चालू शकतो हा व्यवसाय तुम्ही पन्नास हजार ते एक लाख रुपये गुंतवून चालू करू शकता यासाठी तुम्हाला जास्त माहिती असण्याची आवश्यकता नाही तसेच तुमचे कमी शिक्षण असेल तरीही तुम्ही हा व्यवसाय चालू करू शकता.

इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय ? Intraday Trading information in Marathi

Leave a Comment

https://chat.whatsapp.com/HZP8Y0kWefcAWjdCq65flT