युट्युब वरून पैसे कसे कमवायचे | How to Make Money from YouTube in Marathi in 2022

मित्रांनो तुम्हाला प्रश्न पडला असेल की युट्युब वरून पैसे कसे कमवायचे (How to Make Money from YouTube) तसेच ऑनलाईन (online) पैसे कमावण्याचे किती मार्क आहेत व ते कोणते मार्ग आहेत. आणि खरंच आपण त्या मार्गातून ऑनलाईन पैसे कमवू शकतो का.

तसेच ऑनलाईन पैसे कमवण्यासाठी आपल्याला कोणती काळजी घेतली पाहिजे जेणेकरून आपल्यासोबत कोणताही धोका होणार नाही ऑनलाईन पैसे कमावण्याचे भरपूर मार्ग उपलब्ध आहेत त्यातील कोणत्याही एका मार्गाने किंवा अनेक मार्गाने आपण ऑनलाईन पैसे कमवू शकतो.

परंतु यातील कोणताही मार्ग निवडताना त्याबद्दल खोलवर माहिती आपण घेतली पाहिजे एका रात्रीत श्रीमंत होण्याचा कोणताही मार्ग उपलब्ध नाही त्यासाठी तुम्हाला योग्य ते ज्ञान मिळवन खूप गरजेचे आहे. त्यासाठी तुम्ही योग्य तेवढा वेळ दिला पाहिजे.

जसजसा इंटरनेट (internet) वाढत चालला आहे तसं ऑनलाईन पैसे कमावण्याचे प्रकारही वाढत आहेत यामध्ये तुम्ही फक्त मोबाईलचा (mobile) वापर करून किंवा लॅपटॉप कम्प्युटर (laptop, computer) चा वापर करून इंटरनेट चा वापर करून ऑनलाईन पैसे कमवू शकता.

युट्युब वरून पैसे कसे कमावयाचे |How to Make Money from YouTube

युट्युब वरून पैसे कसे कमवायचे

ऑनलाईन पैसे कमावण्याचे यादीत पहिला मार्ग आहे तो म्हणजे यूट्यूब ऑनलाइन पैसे कमवण्यासाठी युट्युब चा सर्वात जास्त उपयोग केला जातो आणि युट्युब वर आपण सर्वात जास्त पैसे कमवू शकतो.

युट्युब हे ॲप सर्वांनाच माहिती आहे आपण युट्युब वर व्हिडीओ बघण्यात भरपूर वेळ वाया घालवतो परंतु बऱ्याच जणांना माहिती नाही की आपण युट्यूब व्हिडिओ बनवून पैसे ही कमवू शकतो.

युट्युब वर भरपूर असे युट्युबर आहेत जे महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत ज्यामध्ये टेक्निकल गुरुजी म्हणजेच गौरव चौधरी, अमित भडाना, कॅरीमिनाती, सौरव जोशी, भुवन बाम यांसारखे युट्यूबर्स आहेत. युट्युब मुळे यांची फॅन फॉलोइंग लाखो करोडो मध्ये आहे तुम्ही यांच्यासारखे जरा हटके व्हिडिओ बनवून युट्युब वरून पैसे कमवू शकता.

युट्युब वरून पैसे कमावण्याचेही वेगवेगळे मार्ग आहेत ते पुढीलप्रमाणे.

युट्युब वरून पैसे कमावण्याचे मार्ग | Ways to make money from YouTube

युट्युब वरून आपण पुढील मार्गाने पैसे कमवू शकतो

युट्युब जाहिराती | YouTube Ads

युट्यूब मधून पैसे कमावण्याचा सर्वात पहिला मार्ग आहे युट्युब जाहिराती जेव्हा आपण युट्युब वर व्हिडिओ बनवतो आणि अपलोड करतो तेव्हा जे लोक आपला व्हिडिओ बघतील त्यांना जाहिरात दिसते. त्या जाहिरातीचे पैसे युट्युब आपल्याला देतो आपले व्हिडिओला जेवढे जास्त लोक बघतील तेवढे जास्त जाहिराती दिसतील आणि आपल्याला जास्त पैसे मिळतील. हे पैसे आपल्याला अडसेन्स या अकाउंटमध्ये मिळतात हे अकाउंट युट्युब शी कनेक्ट असते.

अफिलियेट मार्केटिंग | Affiliate Marketing

युट्युब वर व्हिडिओ बनवणे सोबतच आपण Affiliate Marketing करून पैसे कमवू. शकतो यामध्ये आपण बनवलेल्या युट्युब व्हिडीओ च्या डिस्क्रिप्शन (discription) मध्ये आपण कोणत्याही प्रोडक्टचे ची Affiliate लिंक देऊ शकतो.

जेव्हा कोणी त्या लिंक वर करून एखादी वस्तू किंवा सेवा खरेदी करेल तेव्हा त्याचे कमिशन आपल्याला मिळेल. युट्युब व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही ॲमेझॉन Affiliate Marketing ची लिंक देऊ शकता किंवा अपस्टॉक्स (upstox), एंजल ब्रोकिंग (angel Broking) यांसारख्या रेफर ॲप ची लिंक देउ शकता. जेव्हा कोणी तुमच्या लिंक वरून डिमॅट अकाउंट ओपन करेल तेव्हा त्याचे पैसे तुम्हाला तुमच्या बँक अकाउंट मध्ये मिळतील.

स्पॉन्सर व्हिडिओ | Sponcer Videos

स्पॉन्सर व्हिडिओच्या माध्यमातून पैसे कमावण्यासाठी आपल्याला यूट्यूब चैनल वर 50 हजार ते एक लाख पर्यंत सबस्क्राईब (Subscribers) पाहिजे.

स्पॉन्सर व्हिडिओमध्ये जे नवीन ॲप्स किंवा सर्विस असतात त्या तुमच्याशी कॉन्टॅक्ट करतात आणि त्यांच्या वस्तूचा किंवा ॲप चा व्हिडिओ बनवून तुमच्या यूट्यूब चैनल वर अपलोड करण्यासाठी भरपूर पैसे देतात. यामध्ये तुम्ही त्या वस्तूचा एक व्हिडिओ बनवू शकता किंवा तुमच्या नॉर्मल व्हिडिओमध्ये दहा ते पंधरा सेकंद त्या वस्तूची माहिती देऊ शकता.

तसेच तुम्ही तुमची वेबसाईट असेल तर एखाद्या वस्तूची माहिती वेबसाईट वर देऊन त्या वेबसाइटची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये देऊ शकता यामधून चांगले पैसे कमवू शकता.

युट्युब मध्ये करियर होऊ शकता का | Can be a career in YouTube

ज्यांना YouTube मधून पैसे कमवू शकतो हे माहिती आहे ्यांना एक प्रश्‍न नेहमी पडतो की युट्युब मध्ये आपले करिअर होऊ शकते? का तर याचे उत्तर “हो” आहे. युट्युब मध्ये करिअर होऊ शकतं सध्याच्या काळात भरपूर लोक युट्युब वर पूर्णपणे वेळ देऊन काम करत आहेत त्यांना आपण फुल टाइम युट्युबर असे म्हणतो.

युट्युब साठी जॉब किंवा कॉलेज सोडावं का? | Should You leave your job or college for YouTube?

बऱ्याच जणांच स्वप्न असतं की युट्युब मध्ये करिअर करून भरपूर पैसे कमवावे, परंतु हे काम तुम्ही जॉब करत करत करू शकता किंवा कॉलेज करत करू शकता यासाठी जॉब किंवा कॉलेज सोडने हा कधीही चांगला निर्णय नाही.

परंतु जेव्हा तुम्ही कॉलेज पूर्ण कराल तेव्हा तुम्ही युट्युब साठी पूर्णवेळ देऊ शकता आणि जर तुम्ही जॉब करत असाल तर जेव्हा तुमचा यूट्यूब मधून किंवा ऑनलाइन येणारे पैसे जॉब मधून येणाऱ्या सॅलरी पेक्षा जास्त होतील किंवा सॅलरी एवढे होतील तेव्हा तुम्ही जॉब सोडण्याचा विचार करू शकता.

युट्युब वर चॅनेल कसा बनवायचा | How to Create YouTube Channel

युट्युब हे गुगल ची एक सर्विस आहे त्यामुळे तुम्हाला गुगल अकाऊंट म्हणजेच जी-मेल (Gmail) आयडी असणे आवश्यक आहे, त्याशिवाय तुम्ही यूट्यूब चैनल खोलू शकत नाही.

  1. तुमच्या मोबाईल लॅपटॉप किंवा कम्प्युटरवर युट्यूब लॉगिन करा.
  2. तुमच्या प्रोफाईल फोटो वर क्लिक करा आणि त्यामध्ये क्रिएट चैनल (create channel) वर क्लिक करा.
  3. तुमचा यूट्यूब चैनल ला जे नाव द्यायचे आहे ते टाईप करून इंटर (enter) करा आणि तुमचा यूट्यूब चैनल ओपन होईल.

युट्युब वर व्हिडिओ कसा अपलोड करायचा | How to upload video on YouTube

  1. तुमच्या मोबाईल मध्ये युट्युब ॲप ओपन करा
  2. प्लस (+) या चिन्हावर क्लिक करा
  3. त्यामध्ये दोन नंबरला अपलोड व्हिडिओ (upload video) या बटनावर क्लिक करा.
  4. मोबाईलच्या गॅलरीमध्ये तुम्हाला पाहिजे तो व्हिडिओ सिलेक्ट करा
  5. व्हिडिओला टायटल, डिस्क्रिप्शन, टॅग्ज आणि थंबनेल (Title, Discription, tags and thumbnail) देऊन व्हिडिओ अपलोड करा.

यूट्यूब चैनल मोनेटाइज कसा करायचा | How to Monetize YouTube channel

आपल्या यूट्यूब चैनल च्या व्हिडिओ वर जाहिराती मार्फत पैसे कमवण्यासाठी युट्युब चे काही रूल्स आणि कंडिशन आहेत त्या पूर्ण करावे लागतील त्यानंतरच आपण युट्युब वर व्हिडिओ अपलोड करून त्यातून पैसे कमवू शकतो यूट्यूब च्या जाहिराती येतील आणि आपली कामाई होईल.

मोनेटायझेशन चालू करण्यासाठी युट्युब चे रुल्स

  1. तुमच्या यूट्यूब चैनल वर 1000 सबस्क्रिबर्स पूर्ण झालेले पाहिजे.
  2. गेल्या एका वर्षात तुमचा यूट्यूब चैनल वर 4000 तास पेक्षा जास्त टाईम पाहिजे म्हणजेच तुमच्या यूट्यूब चैनल वर जेवढे व्हिडिओ आहेत त्या सर्व व्हिडिओ मिळून एका वर्षात चार हजार पेक्षा जास्त वेळ व्हिडिओ बघितलेला पाहिजे.
  3. तुमच्या चैनल वर कोणतीही कॉपीराइट स्ट्राइक नाही पाहिजे.
  4. तुमच्या चैनल वर कोणतीही टाक घेऊ कम्युनिटी गाईडलाईन्स स्ट्राइक नाही पाहिजे.
  5. तुमच्या चैनल वर दुसऱ्यांचे व्हिडिओ अपलोड केलेले नसावेत.
  6. व्हिडिओमध्ये वापरलेले व्हिडीओ क्लिप्स फोटो किंवा म्युझिक हे कॉपीराईट फ्री असावीत.
  7. तुम्ही अपलोड केलेले व्हिडिओ हॅकिंग मूवी डाउनलोडिंग मोड ॲप्स डाउनलोड लिंक नसाव्यात तसेच इतर बेकायदेशीर गोष्टींवर व्हिडीओ नसावेत.
  8. वरील सर्व गोष्टी जेव्हा पूर्ण होतील तेव्हा तुम्ही यूट्यूब च्या मोनेटायझेशन साठी अपलाय काय करू शकता
  9. अपलाय केल्यानंतर एक ते दोन आठवड्यात तुम्हाला ईमेल येईल की तुमचा यूट्यूब चैनल पार्टनर प्रोग्राम साठी एक्सेप्ट केलेला आहे त्यानंतर युट्युब चे पैसे तुम्ही तुमच्या Adsense अकाउंट वरती आणि यु ट्यूब वरती पाहू शकता.

हेही वाचा :

इंट्राडे ट्रेडिंग म्हणजे काय ? Intraday Trading information in Marathi

शेअर मार्केट पूर्ण माहिती मराठीतून

Best mic for YouTube

1 thought on “युट्युब वरून पैसे कसे कमवायचे | How to Make Money from YouTube in Marathi in 2022”

Leave a Comment

https://chat.whatsapp.com/HZP8Y0kWefcAWjdCq65flT