डिव्हिडंड म्हणजे काय? | Dividend Information in Marathi

पोस्ट मध्ये आपण बघणार आहे की Dividend information in Marathi आपण डिव्हिडंड मधून कसे पैसे कमवू शकतो, डिव्हिडंड मधून पैसे कमावण्यासाठी आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी आहेत त्या माहिती असणे आवश्यक आहे. या पोस्ट मध्ये आपण बघणार आहे की डिव्हिडंड चे प्रकार कोणते आहेत , डिव्हिडंड मिळण्यासाठी आपण काय केले पाहिजे, डिव्हिडंड वर किती टॅक्स लागतो या सगळ्या गोष्टी आपण इथे बघणार आहे.

डिव्हिडंड म्हणजे काय ? | what is dividend in Marathi

ज्यांचं शिक्षण commerc ने झालाय त्यांना लाभांश म्हणजे काय हे माहिती माहिती असेल माहिती असेल तर चांगली गोष्ट आहे आणि जर माहित नसेल तर आपण या पोस्टमध्ये बघूया की म्हणजे काय असतो तर “डिव्हिडंड म्हणजे काय तर ज्या वेळी एखाद्या कंपनीला नफा होतो तेंव्हा त्यातील काही भाग शेअर होल्डर्सना लाभांश स्वरूपात दिला जातो याला लाभांश असे म्हणतात.”

डिव्हिडंड चे प्रकार  | Types of Dividend in Marathi

Interim dividend अंतरिम डिव्हिडंड

Dividend Information : जेव्हा कंपनी चालू वर्षाच्या मध्ये डिव्हिडंड देते त्याला अंतरिम डिव्हिडंड म्हणतात. या मध्ये कंपनी आर्थिक वर्ष संपण्याच्या आधी किंवा querterly result सोबत हा डिव्हिडंड देते.

Final dividend फायनल डिव्हिडंड

जेव्हा एखादी कंपनी वर्षच्या शेवटी डिव्हिडंड देते त्याला फायनल डिव्हिडंड म्हणतात. या मध्ये कंपनी आर्थिक वर्षाच्या शेवटी फायनल निकालानंतर हा डिव्हिडंड दिला त्यामूळे याला फायनल dividend किंवा अंतीम डिव्हिडंड म्हणतात.

डिव्हिडंड का दिला जातो

जेव्हा एखाद्या कंपनी ला प्रॉफिट होतो तेव्ह ती कंपनी आपल्या शेअरहोल्डर्स ना डिव्हिडंड देते . डिव्हिडंड देताना कंपनी त्याची माहिती जाहीर नोटीस देऊन सांगते Dividend Information in Marathi.

कोणत्या कंपन्या डिव्हिडंड देतात

Dividend Information marathi : प्रत्येक कंपनी डिव्हिडंड देईलच असे नाही किंवा डिव्हिडंड देने हे कंपनी साठी बंधनकारक नाही. शक्यतो त्याच कंपन्या डिव्हिडंड देतात ज्या कंपन्याना गेल्या वर्षी पेक्षा या वर्षी जास्त नफा झाला आहे. आणि जरी नफा झाला तरी कंपनी डिव्हिडंड देईलच असा कोणताही कायदा नाही. बऱ्याच वेळा कंपनी ने डिव्हिडंड किंवा लाभांश जाहीर केल्यानंतर त्या कंपनी च्या share च्या किमती मध्ये वाढ होते कारण बरेच रिटेल ट्रेडर्स ही न्युज येताच त्या कंपनी चे shares खरेदी करतात. परंतु ज्या दिवशी कंपनी डिव्हिडंड देते त्या दिवशी जेवढा डिव्हिडंड दिला आहे तेवढी किंमत कंपनी च्या share च्या किमतीतून कमी होते.

Dividend देणाऱ्या कंपन्या

 1. Gail
 2. ITC
 3. Oil India
 4. Pertonet LNG
 5. Gujrat pip
 6. Infosys
 7. Coal India
 8. BPCL
 9. NTPC

डिव्हिडंड विषयी काही माहिती | Dividend Information in Marathi

डिव्हिडंड भेटल्यावर टॅक्स किती द्यावा लागतो.

Dividend in Marathi डिव्हिडंड हा लाभांश म्हणून दिला जातो त्या वर टॅक्स लागत नाही , परंतु जर डिव्हिडंड ची रक्कम 10 लाख पेक्षा जास्त असेल तर डिव्हिडंड वर टॅक्स द्यावा लागतो, 10 लाखापेक्षा कमी रक्कम जर डिव्हिडंड म्हणून मिळाली तर टॅक्स कोणताही टॅक्स लागत नाही.

डिव्हिडंड चे पैसे कसे मिळतात?

डिव्हिडंड चे पैसे कसे मिळतात: आपण आपल्या डिमॅट अकाउंट ला जे बँक अकाउंट जोडले आहे त्या बँक अकाउंट मध्ये डिव्हिडंड चे पैसे मिळतात dividend marathi.

उदा. जर तुम्ही upstox मध्ये डिमॅट अकाउंट ओपन केलं असेल तर , upstox मध्ये जे बँक अकाउंट जोडले आहे त्या अकाउंट मध्ये डिव्हिडंड चे पैसे येतील

Dividend विषयी महत्त्वाच्या तारखा

Dividend declaration date

Dividend declaration date in Marathi : या तारखेला कंपनी आपल्या शेअर होल्डर्स ना ही माहिती देते की त्यांच्या प्रॉफिट मधील काही भाग dividend म्हणून देणार आहे.

Ex Dividend Date

एक्स डेट म्हणजे तुम्ही जर या तारखेनंतर शेअर खरेदी केला तर तुम्हाला डिव्हिडंड मिळणार नााही, डिव्हिडंड मिळण्यासाठी एक्स डेट च्या आधी तो शेअर तुमच्या डिमॅट अकाउंट होल्डिंग मध्ये असला पाहिजेे dividend in Marathi .

Record date

रेकॉर्ड डेट : या तारखेला कंपनी रेकॉर्ड चेक करते आणि त्यामध्ये ज्यांची नावे असतात ते डिव्हिजन साठी पात्र असतात

Dividend payout date

डिव्हिडंड पे आऊट डेट : या तारखेला पात्र शेअरहोल्डरला डिव्हीडंड हा त्यांच्या बँक अकाउंट मध्ये ट्रान्सफर केला जातो.

डिव्हिडंड न मिळण्याचे कारण

नवीन ट्रेडर्स बऱ्याच वेळा रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट च्या आधीच शेअर खरेदी करतात. तरीही त्यांना डिव्हिडंड मिळत नाही. तर असं का होतं तर, बरेच जण dividend डेट आल्यानंतर जेव्हा त्या कंपनीची डिव्हिडंड साठी दिलेली रेकॉर्ड डेट आणि एक्स डेट च्या अगोदर शेअर खरेदी करतात, तरी त्यांना मिळत नाही. कारण त्यांनी घेतलेला हा एक्स डेट च्या आधी घेतलेला असतो, परंतु तो शेअर जेव्हां पण एक्स डेट किंवा रेकॉर्ड च्या अगोदर आपल्या डिमॅट अकाउंट च्या होल्डिंग मध्ये असला पाहिजे. तेव्हाच आपण Dividend साठी पात्र ठरतो.

T + 2 मुळे डिव्हिडंड मिळत नाही

आपण घेतलेला शेअर हा डिव्हिडंड साठी डिव्हिडंड साठी पात्र होण्यासाठी, तो शेअर आपल्या होल्डिंग मध्ये असला पाहिजे. परंतु आपण घेतलेला शेअर डिमॅट अकाउंटच्या होल्डिंग मध्ये लगेच येत नाही, आपण घेतला शेअर डिमॅट अकाउंट च्या होल्डिंग मध्ये दिसायला एकूण तीन दिवस लागतात. यालाच T +2 दिवस म्हणतात. म्हणजेच ज्या दिवशी शेअर खरेदी केला आहे तो दिवस, ट्रेडिंग दिवस असतो आणि त्याच्या नंतरचे दोन दिवस असे एकूण तीन दिवस लागतात.

डिव्हिडंड चे फायदे

 • डिव्हिडंड हा शेअर मार्केट मधून पैसे कमवण्याचा सेकंडरी मार्ग बनू शकतो. यासाठी आपल्याला स्टॉक मार्केट मधील चांगल्या कंपन्यांमध्ये पैसे गुंतवणूक करणे आवश्यक आहे 
 • डिव्हिडंड मधून भेटणाऱ्या पैशांवर कोणताही टॅक्स लागत नाही.
 • डिव्हिडंड मधून येणारे पैसे कंपनीच्या होणाऱ्या प्रॉफिट सोबत वाढत राहतात.

कॅश डिव्हिडंड – कॅश डिव्हिडंड म्हणजे कंपनी डिव्हिडंड म्हणून पैसे देते हे पैसे आपल्या डिमॅट अकाउंट ला जी बँक अकाउंट लिंक केले आहे की अकाउंटला जमा होतात.

शेअर डिव्हिडंड – शेअर डिव्हिडंड काही कंपन्या डिव्हिडंड म्हणून पैसे देण्याऐवजी फ्री मध्ये शेअर देतात यालाच आपण बोनस शेअर असेही म्हणू शकतो.

प्रॉपर्टी डिव्हिडंड – म्हणजे कंपनी त्यांची प्रॉपर्टी शेअर होल्डर्स ला डिव्हिडंड स्वरूपात देते. जेव्हा कंपनीकडे डिव्हिडंड देण्यासाठी पुरेसे पैसे नसतात तेव्हा कंपनी म्हणून प्रॉपर्टी देते.

स्क्रिप् डिव्हिडंड – स्क्रिप् डिव्हिडंड म्हणजे कंपनी शेअर होल्डर्स ना वचन पत्र देऊन भविष्यात डिव्हिडंड देण्याचे वचन देते. काहीवेळा या वचन पत्रांवर दिले जाते

डिव्हिडंड चे प्रकार

 • कॅश डिव्हिडंड
 • स्क्रीप डिव्हिडंड
 • स्टॉक डिव्हिडंड
 • प्रॉपर्टी डिव्हिडंड
 • Liquidating डिव्हिडंड

कॅश डिव्हिडंड – कॅश डिव्हिडंड म्हणजे कंपनी डिव्हिडंड म्हणून पैसे देते हे पैसे आपल्या डिमॅट अकाउंट ला जी बँक अकाउंट लिंक केले आहे की अकाउंटला जमा होतात.

शेअर डिव्हिडंड – शेअर डिव्हिडंड काही कंपन्या डिव्हिडंड म्हणून पैसे देण्याऐवजी फ्री मध्ये शेअर देतात यालाच आपण बोनस शेअर असेही म्हणू शकतो.

प्रॉपर्टी डिव्हिडंड – म्हणजे कंपनी त्यांची प्रॉपर्टी शेअर होल्डर्स ला डिव्हिडंड स्वरूपात देते. जेव्हा कंपनीकडे डिव्हिडंड देण्यासाठी पुरेसे पैसे नसतात तेव्हा कंपनी म्हणून प्रॉपर्टी देते.

स्क्रिप् डिव्हिडंड – स्क्रिप् डिव्हिडंड म्हणजे कंपनी शेअर होल्डर्स ना वचन पत्र देऊन भविष्यात डिव्हिडंड देण्याचे वचन देते. काहीवेळा या वचन पत्रांवर दिले जाते.

हे डिव्हिडंड चे प्रकार आहेत.

डिव्हिडंड चा शेअर वर काय परिणाम होतो 

कंपनीने डिव्हिडंड जाहीर केल्यावर बरेच जण त्या कंपनीचा शेअर खरेदी करतात. त्यामुळे शेअरची किंमत वाढते. परंतु कंपनी ज्या दिवशी डिव्हिडंड देते, त्या दिवशी दिलेल्या शेअरच्या तिथून रक्कम कमी होते.

उदाहरण. – 

टाटा मोटर्स कंपनीच्या शेअरची किंमत पाचशे रुपये आहे. आणि कंपनीने वीस रुपये दिविदेंड जाहीर केला आहे. ज्या दिवशी टाटा मोटर्स ही कंपनी वीस रुपये देईल, त्या दिवशी कंपनीच्या शेअरची किंमत पाचशे रुपये वरून 480 रुपये वर येईल.

Conclusion / निष्कर्ष

मध्ये या पोस्टमध्ये आपण बघितले की डिव्हीडंड म्हणजे काय डिव्हीडंड घेण्यासाठी काय करावे लागते. Dividend कोणाला मिळतो, यासाठी टॅक्स किती लागतो, dividend आपल्याला कोणत्या अकाउंट मध्ये मिळतो तसेच आपण शेअर मार्केट विषयी पूर्ण माहिती आपल्या वेबसाईटवर देत आहोत ही माहिती पूर्णपणे मोफत आहे, अजून माहितीसाठी तुम्ही आपल्या वेबसाइटवर सर्च करू शकता किंवा खाली दिलेल्या पोस्ट वाचू शकता तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर आपल्या मित्रांसोबत शेअर करा आणि आपला फीडबॅक आणि सूचना आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा.

2 thoughts on “डिव्हिडंड म्हणजे काय? | Dividend Information in Marathi”

Leave a Comment