Single Candlestick Patterns in Marathi : या पोस्ट मध्ये आपण सिंगल कॅण्डलस्टिक या पोस्ट मध्ये आपण विषयी माहिती घेणार आहोत, सिंगल या पोस्ट मध्ये आपण सिंगल कॅण्डलस्टिक पॅटर्न मध्ये अनेक पॅटर्न आहेत ते सर्व पॅटर्न विषयी आपण माहिती घेणार आहे, तसेच त्यांचा वापर आपण कसा करायचा हेही आपण बघणार आहे.
Candlestick information in Marathi : खाली जी कँडल दिसत आहे त्या कँडल ला जपानी कॅन्डलस्टिक असं म्हटलं जातं याची सुरुवात अठराव्या शतकात एका तांदळाच्या व्यापाऱ्यानी केली होती, जपान मध्ये किमती च एनालिसिस करण्यासाठी याच्या आधी पासून कॅन्डलस्टिक चा वापर केला जात होता परंतु याची माहिती जपान सोडून कोणत्याच देशाला नव्हती.
1980 मध्ये स्टिव्ह निसोन नावाच्या व्यापाऱ्याने या कॅन्डल चा वापर बघितल्यानंतर बाकी जगाला कॅन्डलस्टिक विषयी माहिती दिली आणि मग पूर्ण जगामध्ये याचा वापर केला जाऊ लागला याचा वापर सतत किंमत बदलणाऱ्या वस्तूंच्या किमतीच ॲनालिसिस करण्यासाठी केला जातो.
Green | Bullish Candle
खाली जी कॅण्डल दिसत आहे ती ग्रीन कॅण्डल आहे, म्हणून याला बुलीश कॅण्डल असे म्हटले जाते.
Candlestick Information in Marathi
उदाहरण : एका share ची किंमत मार्केट ओपन झाले त्यावेळेस शंभर रुपये होती काही वेळाने त्या share ची किंमत 120 रुपये वर गेली परत 120 वरून खाली येत 90 रुपये वरली आणि 90 वरून परत 110 वर गेली आणि मार्केट बंद झाले.

यामध्ये किमतीची सुरुवात आणि शेवट किती आहे तर, सुरुवात आहे 100 आणि शेवट आहे 110 म्हणजेच मार्केट ज्या वेळेस सुरू झाले त्यावेळेस शेअरची किंमत शंभर होती आणि ज्या वेळेस बंद झालं त्यावेळेस शेअर ची किंमत 110 होती यालाच आपण सुरुवातीची किंमत म्हणजेच ओपन आणि मार्केट बंद होताना ची किंमत म्हणजेच क्लोज 110 आहे.
[ओपन/open = 100
क्लोज/close = 110 ]
Share Market Marathi
तसेच शेअरची सगळ्यात जास्त किंमत ही जास्तीत जास्त एकशे वीस रुपये पर्यंत गेली होती आणि कमीत कमी नव्वद रुपयांपर्यंत आली होती त्यामुळे 120 रुपये ही हाय प्राईज होती त्यामुळे कॅण्डल चा हाय/high 120 असेल आणि सगळ्यात कमी 90 रुपये किंमत होती त्यामुळे कॅण्डल चा लो/low हा 90 रुपये असेल.
[टीप : ग्रीन किंवा बुलिश कॅण्डल मध्ये रियल बॉडी ची खालची बाजू ओपन असते आणि वरची बाजू म्हणजे क्लोज असते.]
Open = 100
Close = 110
High = 120
Low = 90
Red | Bearish Candle
समोर जी कॅन्डलस्टिक दिसत आहे या रेड कॅण्डल ला बियरिष Bearish कॅण्डल म्हणतात, जेव्हा मार्केट पडत असतं त्यावेळेस चार्ट मध्ये रेड कॅण्डल दिसते यालाच बेअरिष मार्केट म्हणतात.
Candlestick Information marathi
उदाहरण एक स्टॉक आहे ज्याची किंमत मार्केट ओपन झाले त्यावेळेस शंभर रुपये होती परत शंभर वरून 110 वर गेली , 110 वरून त्या स्टॉकची किंमत परत शंभर वर आली 100 वरून परत वर आली 80 वरून परत 90 वर गेली आणि मार्केट क्लोज झालं.
ज्यावेळेस मार्केट चालू झालं त्यावेळेस शेअरची किंमत शंभर होती आणि ज्या वेळेस मार्केट बंद झालं त्यावेळेस शेअरची किंमत 90 रुपये होती म्हणजेच कॅण्डल मध्ये ओपन प्राईस ही शंभर रुपये असेल आणि क्लोज प्राईज 90 रुपये असेल.
ओपन = 100 – क्लोज = 90
तसेच शेअरची किंमत त्यादिवशी जास्तीत जास्त 110 वर होती आणि कमीत कमी 80 रुपये होती म्हणजेच या रेड कॅण्डल चा हाय high 110 असेल आणि लो low 80 रुपये असेल
[ टीप – रेड कॅण्डल मध्ये ओपन प्राईस क्लोज प्राइस पेक्षा जास्त असते. ]
[ रेड किंवा बेअरिष कॅण्डल मध्ये रियल बॉडी च्या खालच्या बाजूला क्लोज आणि वरच्या बाजूला ओपन असं म्हटलं जातं. ]
मारूबोझू कॅण्डल | Marubozu Candle In Marathi
सिंगल कॅण्डलस्टिक पॅटर्न मध्ये पहिली कॅण्डल आहे मारू बाजू कॅण्डल हा मारू बाजू हा जपानी शब्द आहे याचा मराठी मध्ये करत होतो टकला कारण या कॅण्डल मध्ये Upper Shadow किंवा Lower Shdow नसते. या Candle मध्ये फक्त रियल बॉडी असते, candle लहान असेल तर ती कॅण्डल फेक असू शकते किंवा Trap असू शकतो. खरी Marubozu Candle ही मोठी असते जर मोठ्या Marubozu Candle कॅण्डल ला लहान अप्पर शाडो किंवा lower शाडो असेल तर त्यालाही आपण Marubozu Candle Candle म्हणू शकतो.
Bullish Marubozu Candlestick Information in Marathi
bullish Marubozu Candle मध्ये अपर शाडो किंमत लॉवर शाडो नसल्यामुळे
open = low¢
Close = High
Marubozu Candle कॅण्डल मध्ये Buyers कोणत्याही किमतीला शेअर खरेदी करायला तयार असतात त्यामुळे शेअर हाय/high आणि लो/low बनवत नाही फक्त ओपन आणि क्लोज बनवतो.
Bearish Marubozu Candle in Marathi
बेअरिष Marubozu Candle जो ज्यावेळेस फॉर्म होईल त्यावेळेस किंवा त्यानंतर मार्केट पडेल असा अंदाज आपण लावू शकतो बियरिष Marubozu Candle दिसल्यावर आपण शॉर्ट सेलींग ची अपॉर्च्युनिटी बघितली पाहिजे.
या Candle मध्ये ओपन म्हणजेच हाय आणि क्लोज म्हणजेच लो असतो.
open = High
Close = Low
Marubozu Candle मध्ये मार्केट पडत असल्यामुळे ट्रेडर्स कोणत्याही किमतीला शेअर सेल करायला तयार असतात त्यामुळे या कॅण्डल मध्ये फक्त ओपन आणि क्लोज असतो.
स्पिननिंग टॉप कॅण्डल | Spinning top candle information in marathi
या candle ला Spinning Top candle म्हणतात, ही Spinning Top candle, Strong Uptrend मध्ये किंवा strong downtrend मध्ये दिसते.
1] uptrend मध्ये जर Spinning Top candle दिसली तर आपण म्हणू शकतो की सेललेर्स ऍक्टिव्ह होत आहेत, किंवा ही downtrend ची सुरुवात असू शकते.
Candlestick information in Marathi
2] downtrend मध्ये जर Spinning Top candle दिसली तर आपण म्हणू शकतो की Buyers ऍक्टिव्ह होत आहेत , आणि ही uptrend ची सुरुवात आहे.
3] Spinning Top candle मध्ये Real Body ही अतिशय लहान असते आणि wicks/ Shadow मोठ्या असतात. { Real body छोटी असल्यामुळे candle च्या colour ला महत्व नसते. }
4] या Candle चा Open आणि Close जवळ असतो.
5] मार्केट Bullish आहे की Bearish आहे हे या Candle वरून स्पष्ट होत नाही.
6] Uptrend मध्ये जर स्पिननिंग टॉप candle दिसली तर मार्केट परत उपट्रेंड मध्ये जाऊ शकत किंवा ट्रेंड रिव्हर्स होऊ शकतो म्हणजेच Downtrend मध्ये जाऊ शकतं.
7] Downtrend मध्ये जर Spinning Top candle फॉर्म झाली तर , मार्केट परत Downtrend मध्ये जाऊ शकतं किंवा trend रिव्हर्स होऊन परत Uptrend होऊ शकतो.
8] Spinning Top candle नंतर मार्केट मध्ये मोठी मोव्हमेंट होऊ शकते, मार्केट चांगल्या प्रमाणात Upside किंवा Downside Move होऊ शकतं.
डोजी कॅण्डल | Doji Candlestick Information in Marathi
Single candlestick pattern मधील पुढील महत्वाचा पॅटर्न आहे डोजी pattern pattern . या doji candle मध्ये रिअल बॉडी नसते, त्यामुळे ओपन आणि क्लोज किंमत समान असते. आणि wicks / shadow या लहान किंवा मोठ्या असू शकतात.
Spining Top candle ला जे नियम होते तेच नियम Doji candlestick pattern ला लागू होतात.
doji candle चे चार प्रकार आहेत ते पुढील प्रमाणे,
1- Star Doki
2- Long Legged Doki
3- Dragonfly Doki
4- Gravestone Doki
या candle मध्ये रिअल बॉडी नसल्यामुळे ओपन आणि क्लोज किंमत एकच असते.
दुसरी गोष्ट म्हणजे रिअल बॉडी नसल्यामुळे या candle ला green किंवा red colour नसतो, न्हाणजेच candle Bullish आहे किंवा bearish आहे असं म्हणता येणार नाही.
बऱ्याच वेळा doji candle आणि spinning top candle या दोन्ही candle चार्ट मध्ये एकत्रच बघायला मिळतात.
doji candle मध्ये buyers आणि sellers यांच्यामध्ये युद्ध चाललं आहे आणि दोघांकडे समान ताकद आहे असं आपण म्हणू शकतो.
Doji Pattern हा रेव्हर्सल पॅटर्न आहे, uptrend मध्ये जर doji candle असेल तर त्यानंतर downtrend चालू होऊ शकतो, आणि Downtrend मध्ये डोजी असेल तर uptrend चालू होऊ शकतो.
Paper Umbrella Candlestick Pattern in Marathi
Paper Umbrella Candlestick वरून आपण मार्केट ची संभाव्य दिशा ओळखू शकतो. Paper Umbrella Candlestick पॅटर्न हा reversal पॅटर्न आहे.
Paper Umbrella मध्ये दोन पॅटर्न आहेत, ते पुढीलप्रमाणे
1] हँगिंग मॅन Hanging Man
2] हॅमर पॅटर्न Hammer Candlestick pattern in Marathi
या मध्ये हँगिंग मॅन हा बेअरिष पॅटर्न आहे तर हॅमर हा बुलीश पॅटर्न आहे. दोन्ही पॅटर्न हे दिसायला सारखेच आहेत मग यांना hanging man आणि Hammer अशी वेगवेगळी नवे का आहेत .
1] Downtrend मध्ये जर Paper Umbrella पॅटर्न दिसला तर त्याला हॅमर म्हणतात.
2] Uptrend मध्ये जर Paper Umbrella Candle दिसली तर त्याला Hanging Man म्हणतात.
3] Paper Umbrella ची lower Shadow ही रिअल बॉडी च्या दुप्पट असली पाहिजे.
हॅमर पॅटर्न Hammer Pattern information in Marathi
हॅमर हा पॅटर्न downtrend मध्ये बनतो.
जेवढी लांब lower shadow तेवढा स्ट्रॉंग Bullish Signal.
थोडीशी upper Shadow असू शकते.
या candle च्या colour {red/green} महत्व नसते.
हॅमर हा buyers ऍक्टिव्ह होत असल्याचा सिग्नल देतो.
हॅमर पॅटर्न च्या आधी downtrend असणे आवश्यक आहे.
हँगिंग मॅन | Hanging Man pattern in Marathi
uptrend मध्ये जेव्हा Paper Umbrella दिसते, तेव्हा त्याला हँगिंग मॅन म्हणतात.
जेवढी लांब lower shadow तेवढा स्ट्रॉंग सिग्नल.
थोडीशी upper shadow असू शकते.
या candle च्या colour {red/green} महत्व नसते.
हँगिंग मॅन हा sellers ऍक्टिव्ह होत असल्याचा सिग्नल देतो.
हँगिंग मॅन पॅटर्न च्या आधी Uptrend असणे आवश्यक आहे.
[ Hammer pattern is better than hanging man ]
शूटिंग स्टार| Shooting Star Candlestick Pattern
हा Single Candlestick Pattern मधला शेवटचा पॅटर्न आहे. हा पॅटर्न इन्वेरटेड हॅमर सारखा आहे.
या मध्ये candle ची upper shadow ही मोठी असते. आणि रिअल बॉडी लहान असते. या candle ची upper shadow ही real body च्या दुप्पट किंवा त्यापेक्षा मोठी असते. शूटिंग स्टार हा पॅटर्न फक्त बेअरिष पॅटर्न आहे.
या पॅटर्न मध्ये short selling ची opportunity बघितली पाहीजे.
शूटिंग स्टार हा बेअरिष पॅटर्न आहे त्यामुळे आधीच ट्रेंड हा uptrend असला पाहिजे.
शेअर मार्केट मराठी माहिती | Share Market Information in Marathi
Very nicely explained
Hi sir I want candle stick information.