ब्लॉगिंग म्हणजे काय? | Blogging in Marathi 2022

Blogging in Marathi : ब्लॉगिंग मधून पैसे कसे कमवायचे ऑनलाईन पैसे कमावण्यासाठी सर्वात चांगला पर्याय म्हणजे ब्लॉगिंग होय, ब्लॉगिंग मधून आपण घरी बसून पैसे कमवू शकतो, भारतातील हजारो ब्लॉगर्स, ब्लॉगिंग करून लाखो-करोडो रुपये कमवत आहेत Blogger.com वर आपण फ्री मध्ये ब्लॉगची सुरुवात करू शकतो.

तुम्हाला ज्या गोष्टी विषयी जास्त माहिती आहे त्या गोष्टीविषयी लिखाण तुम्ही ब्लॉगर वर करू शकता. आजच्या काळात एक चांगलं करिअर म्हणून आणि जास्तीत जास्त पैसे कमवण्यासाठी ब्लॉगींग कडे बघितले जात आहे. ब्लॉगिंग मध्ये तुम्ही पैसे सोबतच लोकप्रियताही मिळवू शकता.

Blogging in marathi

ब्लॉगिंग म्हणजे काय? | Blogging in Marathi

Blog in Marathi : ब्लॉग म्हणजे वेब ब्लोग. ब्लॉग हा इंग्रजी शब्द असून याची सुरुवात 1998 मध्ये झाली होती. ब्लॉगर ( blogger) गुगल द्वारे दिलेली फ्री सर्विस आहे. आपण आपले विचार आपल्या ब्लॉग वर लिहून पूर्ण जगा सोबत शेअर करू शकतो. ब्लॉग चा उपयोग आपले विचार दुसऱ्या समोर मांडण्यासाठी केला जातो तुम्ही तुमच्या ब्लॉग वर लिहिलेली पोस्ट विषयी जो कोणी गुगल वर सर्च करेल त्याला तुमची पोस्ट दिसते. किंवा तुम्ही लिहिलेल्या ब्लॉग पोस्ट ची लिंक तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता.

ब्लॉग ही एक वेबसाईट असते जी आपण फ्री मध्ये किंवा पैसे देऊन बनवू शकतो. आपण ब्लॉगर डॉट कॉम वर फ्री मध्ये ब्लॉग बनवू शकतो किंवा तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही ब्लॉग साठी डोमेन नेम आणि होस्टिंग विकत घेऊन ब्लॉगींग स्टार्ट करू शकता.

तुम्हाला प्रश्न पडला असेल की फ्री ब्लॉक आणि पेड (Paid) ब्लॉग मध्ये फरक काय आहे याचे उत्तर सोपे आहे कोणत्याही गोष्टीसाठी आपण जेव्हा पैसे देतो तेव्हा त्याचा जास्तीचा फायदा आपल्याला भेटत असतो. तसेच फ्री आणि पेड ब्लॉगिंग मध्ये आहे. पेड ब्लॉगिंग आणि फ्री ब्लॉगिंग यामध्ये फरक काय आहे हे आपण पुढे बघणार आहे.

फ्री ब्लॉगिंग कसं करायचं | How to do Free Blogging

Blogging meaning in marathi आपण ब्लॉग म्हणजे काय हे बघितलं आता पण फ्री ब्लॉग काय असतो ते बघूया. जर तुम्ही ब्लॉग मध्ये नवीन असाल तर तुम्ही फ्री ब्लॉगिंग करू शकता आणि जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही पेड ब्लॉगिंग हि करू शकता फ्री ब्लॉक बनवण्यासाठी तुम्हाला ब्लॉगवर अकाउंट ओपन करावा लागेल.

ब्लॉगरवर अकाउंट ओपन केल्यानंतर तुम्हाला तुमच्या ब्लॉग किंवा वेबसाइट्स डोमेन नेम द्यावा लागेल. ब्लॉगरवर तुम्हाला फ्री मध्ये सब डोमेन मिळेल. मिळाल्यावर तुम्ही तुमचा ब्लॉग चांगल्या प्रकारे योग्य ती थीम किंवा टेम्प्लेट(theme or template) ऍड करू शकता यामुळे तुमचा ब्लॉग आकर्षक दिसेल, यानंतर तुम्ही आवश्यक ती सेटिंग करून तुमचा पहिला ब्लॉग पोस्ट लिहायला सुरू करू शकता.

फ्री ब्लॉगिंग चे फायदे आणि तोटे | Advantages and Disadvantages of free Blogging

फायदे | Advantages

 1. फ्री ब्लोगिंग हे पूर्णपणे फ्री असते आपल्याला एक रुपया ही गुंतवणूक करण्याची गरज नाही.
 2. फ्री ब्लॉग मध्ये आपल्याला डोमेन किंवा होस्टींग साठी पैसे लागत नाहीत या दोन्ही गोष्टी आपल्याला फ्री मध्ये मिळतात.
 3. ब्लॉगर मध्ये गुगल तर्फे अनलिमिटेड होस्टिंग मिळते तुमच्या ब्लॉगवर कितीही युजर्स आले तरीही तुमची साईट क्रॅश होत नाही.
 4. तुम्ही ब्लॉगरवर डॉट कॉम किंवा डॉट इन ( .Com or .In ) असे कस्टम डोमेन ऍड करू शकता.
 5. ब्लॉगर वर ब्लॉगिंग तुम्ही तुमच्या मोबाईल मध्ये कोणत्याही अडचणी शिवाय करू शकता.
 6. तुम्हाला ब्लॉगर मध्ये फ्री मध्ये एस एस एल सर्टिफिकेट ( SSL Certificate ) मिळते.
 7. ब्लॉगरवर तुम्ही पाहिजे तेवढे ब्लॉग पूर्णपणे मोफत चालू करू शकता.

तोटे | Disadvantages

 1. फ्री ब्लॉगिंग मध्ये तुम्हाला सब डोमेन ( Sub Domain ) मिळते जे seo ( search engine) साठी चांगले नाही.
 2. फ्री ब्लोग मध्ये सब डोमेन मुळे आपला ब्लॉग गुगल मध्ये रँक होणे कठीण जाते.
 3. तुम्हाला फ्री ब्लोग मध्ये कस्टम डोमेन ॲड करण्यासाठी पैसे लागतात.
 4. फ्री ब्लोग मध्ये थिम्स किंवा टेम्प्लेट मर्यादीत असतात.
  हा ब्लॉग चांगल्या प्रकारे डिझाईन करण्यासाठी स्वतः कोडींग करावी लागते जे खूप कठीण काम आहे.
 5. फी ब्लॉग मध्ये प्लगइन नसल्यामुळे आपल्याला ब्लॉग पाहिजे तसा डिझाईन करता येत नाही.

How to Make Money from YouTube in Marathi in 2022

पेड ब्लॉगिंग म्हणजे काय? | What is Paid Blogging

आपण फ्री ब्लॉग म्हणजे काय बघितला आहे आता आपण बघूया की पेड ब्लॉगिंग काय असतं.
पेड ब्लॉगिंग मध्ये आपल्याला डोमेन नेम आणि पोस्टिंग साठी पैसे द्यावे लागतात यालाच पॅड ब्लॉगिंग म्हणतात.
पेड ब्लॉगसाठी आपल्याला कस्टम डोमेन नेम विकत घ्यावे लागते यामध्ये आपण डॉट कॉम, डॉट इन, डॉट नेट (.Com , .In , .Net ) यांसारखे डोमेन एक्सटेंशन मिळतात हे डोमेन आपण गो डॅडी डॉट कॉम ( Godaddy.com ) वरून घेऊ शकतो. तसेच आपल्याला ही वेबसाईट किंवा ब्लॉग चालू करण्यासाठी डोमेन ला hosting सोबत कनेक्ट करावं लागतं.

Blogging in marathi

ब्लॉगिंगसाठी तुम्ही hostinger.com वरून hosting घेऊ शकता. Hostinger वर तुम्ही 100 पेक्षा जास्त वेबसाईट ऍड करू शकता, या hosting चा वर्षा चा प्लॅन तीन हजार दोनशे रुपयांचा आहे यामध्ये तुम्ही एक वर्ष सर्विस घेऊ शकता.
तुम्ही घेतलेल्या डोमेन नेम होस्टिंग ला जोडून त्यामध्ये वर्डप्रेस इन्स्टॉल केल्यानंतर तुमची वेबसाईट किंवा ब्लॉग चालू होतो.

पेड ब्लॉगींग चे फायदे आणि तोटे | Advantages and Disadvantages of Paid Blogging

फायदे | Advantages

 1. जास्तीत जास्त ब्लोगर हे ब्लॉगिंगसाठी पेड टूल्सचा वापर करतात.
 2. पेड ब्लॉगिंग मध्ये आपण आपल्या ब्लॉगला पाहिजे त्या पद्धतीने कस्टमाइज करू शकतो.
 3. यामध्ये आपल्याला असंख्य थिम्स मिळतात त्यांचा वापर आपण करू शकतो.
 4. पेड ब्लॉग मध्ये आपल्याला वेबसाईट डिझाईन साठी वेगवेगळे प्लग इन मिळतात, त्यामुळे आपल्याला वेबसाईट बनवण्यासाठी कोडींग शिकण्याची गरज नाही.
 5. यामध्ये आपल्याला वेगवेगळे टूल्स मिळतात त्यामुळे आपला ब्लॉग गुगल सर्च इंजिनमध्ये लवकर रँक Rank होतो.
 6. फ्री ब्लॉक च्या तुलनेत आपल्याला वर्डप्रेस मध्ये जास्त पैसे मिळतात.
 7. आपण यामध्ये ॲडव्हान्स seo करू शकतो जो आपल्याला फ्री ब्लोगिंग मध्ये करता येत नाही आपण यासाठी yoast seo, rank math याचा वापर करू शकतो.
 8. डाटा बॅकअप हा पेड ब्लॉगचा खूप मोठा फायदा आहे जर तुम्ही होस्टिंग बदलली किंवा वेबसाईट बदलली तर तुम्ही तुमच्या वेबसाईट वरील सर्व डाटा जुन्या वेबसाईटवरुन नवीन वेबसाईटवर ट्रान्सफर करू शकता.

तोटे | Disadvantages

 1. पेड ब्लॉगिंग मध्ये आपल्याला पैसे गुंतवावे लागतात चांगली वेबसाईट बनवण्यासाठी आपल्याला तीन ते चार हजार रुपये आवश्यक आहेत.
 2. यामध्ये आपल्याला डोमेन आणि गोष्टींसाठी पैसे द्यावे लागतात.
 3. वर्डप्रेस मध्ये आपण भरपूर प्लगइन वापरू शकतो, परंतु त्यामुळे आपली वेबसाईट लोडींग स्पीड कमी होते.

आपल्या ब्लॉग मधून पैसे कसे कमवायचे | How to Make Money from our Blog

आतापर्यंत आपण बघितलं की ब्लॉग म्हणजे काय फ्री ब्लॉग म्हणजे काय पेड ब्लॉगिंग म्हणजे काय आणि फ्री आणि पेड ब्लॉगिंग चे फायदे आणि तोटे ही बघितले। आता पण बघणार आहे की ब्लॉगमधून आपण पैसे कसे कमवायचे, ब्लॉग मधून पैसे कमावण्याचे वेगवेगळे प्रकार आहेत ते आपण बघणार आहे.

AdSense

ब्लॉग मधून पैसे कमवण्यासाठी सर्वात पहिला आणि सर्वात जास्त वापरला जाणारा मार्ग म्हणजे एडसेंस आहे. AdSense ही गुगलची सर्विस आहे तुम्ही तुमच्या ब्लोग मधून पैसे कमावण्यासाठी तुमचा ब्लॉग मध्ये ऍड सायन्सच्या ads लावाव्या लागतात. ( AdSense च्या ads लावण्यासाठी तुम्हाला तुमचा ब्लॉग एडसेंस ॲप्रोवल घ्यावा लागेल.)

Affiliate marketing

Affiliate marketing हा शब्द तुम्ही ऐकला असेलच आपल्या ब्लॉग वर जास्त युजर्स येत असतील तर आपण Affiliate marketing मधून चांगले पैसे कमवू शकतो ब्लॉग मधून पैसे कमावण्यासाठी एडसेंस नंतर सर्वात जास्त पैसे करून देऊ शकतो तो म्हणजे Affiliate marketing. यासाठी तुमचा ब्लॉग ज्या विषय आहे त्याच्याशी संबंधित कंपन्यांशी किंवा ॲमेझॉन किंवा इतर कंपन्यांची Affiliate लिंक तुमच्या ब्लॉग मध्ये लावू शकता.
Hosting, demat account referral, Amazon affiliate यांसारख्या कंपन्यांचा पार्टनर प्रोग्राम तुम्ही जॉईन करू शकता.

5 thoughts on “ब्लॉगिंग म्हणजे काय? | Blogging in Marathi 2022”

Leave a Comment