आज आपण best brokers in india in marathi बघणार आहोत. या पोस्ट मध्ये अश्या ब्रोकर्स ची माहीती दिली आहे जे ब्रोकर्स चांगली सर्विस देतात. तसेच आपण प्रत्येक ब्रोकर रेफेर साठी किती रुपये देतो याचीही माहिती घेणार आहोत तसेच दिलेल्या ब्रोकर सोबत डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी किती चार्जेस आहेत याची माहिती दिली आहे.
Zerodha Broker information in marathi
zerodha हा भारतातील पहिला ब्रोकर आहे ज्याने भारतामध्ये डिस्काउंट ब्रोकिंग ची सुरुवात केली. zerodha ही भारतातील आर्थिक सेवा देणारी कंपनी आहे, zerodha मधून आपण Share Market, Mutual Funds, Currency Market, Commodities Market मध्ये गुंतवणूक करू शकतो. zerodha ची सुरुवात 2010 मध्ये बंगलोर येथे झाली होती. zerodha हा भारतातील सर्वात जास्त ग्राहक असलेला ब्रोकर आहे.
Zerodha delivery ट्रेडिंग साठी कोणतेही पैसे किंवा फी लावत नाही, डिलिव्हरी ट्रेडिंग हे Zerodha मध्ये पूर्णपणे फ्री आहे.
Zerodha मोबाईल मधेही वापरता येते, हे अँप फक्त 9.5mb चे आहे.
Playstore वर Zerodha चे 10million पेक्षा जास्त downloads आहेत.
हा ब्रोकर intraday ट्रेडिंग साठी 5 पट margin देते.
यामध्ये प्रत्येक ट्रेड वर जास्तीत जास्त 20 रुपये चार्ज घेते.
Zerodha मध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी 300 रुपये लागतात.
Zerodha मध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी लागणारी documents
आधार कार्ड [ मोबाईल नंबर लिंक आवश्यक ]
पॅन कार्ड
बँक अकाउंट
Upstox broker information in marathi
Upstox एक भारतीय ब्रोकर आहे. zerodha प्रमाणेच Upstox ही डिस्काउंट ब्रोकर आहे. Upstox हा भारतातील सर्वात वेगाने ग्राहक संख्या वाढणारा ब्रोकर आहे. Upstox मांडून आपण stock market, mutual funds, currency market, committee market मध्ये गुंतवणूक करू शकतो. भारतातील सर्वात मोठ्या ब्रोकर्स पैकी Upstox एक आहे. Upstox चे 50 लाख पेक्षश जास्त ग्राहक संख्या आहे. भारतातील सर्वात यशस्वी उद्योजक रतन टाटा सर ही Upstox चे ग्राहक आहेत, यावरून आपण Upstox हा ब्रोकर किती विश्वासू ब्रोकर आहे हे समजू शकतो.
Upstox मधेही delivery ट्रेडिंग साठी कोणतेही पैसे किंवा फी लागत नाही, Upstox मध्ये डिलिव्हरी ट्रेडिंग हे पूर्णपणे फ्री आहे.
Upstox मोबाईल मधेही वापरता येते, हे अँप फक्त 23mb चे आहे.
Playstore वर Upstox चे 10million पेक्षा जास्त downloads आहेत.
हा ब्रोकर intraday ट्रेडिंग साठी 6 पट margin देतो .
यामध्ये प्रत्येक ट्रेड वर जास्तीत जास्त 20 रुपये चार्ज घेते.
Upstox मध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी कोणतेही चार्जेस घेत नाही, Upstox मध्ये अकाउंट ओपनिंग पूर्णपणे फ्री आहे.
Upstox मध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी लागणारी documents
आधार कार्ड [ मोबाईल नंबर लिंक आवश्यक ]
पॅन कार्ड
बँक अकाउंट
डिव्हिडंड म्हणजे काय? | Dividend Information in Marathi
Upstox refer and earn
Upstox मध्ये आपण ट्रेडिंग सोबतच Refer and earn मधून ही पैसे कमवू शकतो.
म्हणजेच आपण आपल्या मित्राला Upstox वर नवीन ट्रेडिंग आणि डिमॅट अकाउंट ओपन करून देऊ शकतो. यासाठी आपले डिमॅट अकाउंट आसने आवश्यक आहे . आपल्या मित्राला रेफेर करण्यासाठी त्याला आपली रेफर लिंक पाठवावी लागते आणि त्याच लिंक चा वापर करून मित्राने अकाउंट ओपन करणे गरजेचे आहे.
सध्या Upstox मध्ये एक रेफेर ला 1200 रुपये मला आहेत. म्हणजेच तुम्ही जर 10 मित्रांना Upstox अकाउंट ओपन करण्यासाठी मदत केली तर तुम्ही त्यामार्फत 12000 रुपये कमवू शकतो.
Angel broking information in Marathi
Angel Broking हा zerodha आणि upstox पाठोपाठ भारतातील तिसरा सर्वात मोठा ब्रोकर आहे. Angel Broking ही zerodha आणि upstox प्रमाणेच डिस्काउंट ब्रोकर आहे. Angel Broking च नवीन नाव angel one आहे. Angel Broking ची सुरुवात 1996 मध्ये झाली होती. Angel One CDSL [ central depository services limited ] सॊबत depository आहे. Angel One च्या भारतामध्ये एकूण 9000 पेक्षा जास्त फ्रेंचाईसी आहेत. Angel One मध्ये आपण stock market, mutual funds, bonds, commodity market, derivative market, currency market मधेही गुंतवणूक करू शकतो. Angel One हा डिलिव्हरी ट्रेडिंग साठी margin देणारा एकमेव ब्रोकर आहे.
Angel One मधेही delivery ट्रेडिंग साठी कोणतेही पैसे किंवा charges लागत नाही, Angel One मध्ये डिलिव्हरी ट्रेडिंग हे पूर्णपणे फ्री आहे.
Angel One मोबाईल मधेही वापरता येते, हे अँप फक्त 18mb चे आहे.
Playstore वर Angel One चे 10 million पेक्षा जास्त downloads आहेत.
हा ब्रोकर intraday ट्रेडिंग साठी 6 पट margin देतो .
Angel One मध्ये आपल्याला डिलिव्हरी ट्रेडिंग साठीही margin मिळते.
यामध्ये प्रत्येक ट्रेड वर जास्तीत जास्त 20 रुपये चार्ज घेते.
Angel One मध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी कोणतेही चार्जेस घेत नाही, म्हणजेच अकाउंट ओपनिंग पूर्णपणे फ्री आहे.
Angel One मध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी लागणारी documents
आधार कार्ड [ मोबाईल नंबर लिंक आवश्यक ]
पॅन कार्ड
बँक अकाउंट
AngelOne Refer and earn
Angel One मध्ये आपण refer and earn प्रोग्रॅम मधूनही पैसे कमवू शकतो. आपण आल्या मित्राला Angel One मध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी मदत करू शकतो, यासाठी आपले अकाउंट Angel One मध्ये आसने आवश्यक आहे.
आपण आपली रेफेर लिंक आपल्या मित्राला पाठवून त्या लिंक वरून जेव्हा आपला मित्र अकाउंट ओपन कारेल तेव्हा आपल्याला referral reward भेटतो.
Angel One मध्ये प्रत्येक रेफेर साठी 750 रुपये भेटतात.
जर तुम्ही 10 रेफर केले तर तुम्हाला 7500 रुपये भेटतील.
आयसीआयसीआय डायरेक्ट ब्रोकर
आयसीआयसीआय ही भारतातील सर्वात मोठी प्रायव्हेट बँक आहे. या बँकेच्या भारतामध्ये पाच हजारापेक्षा जास्त शाखा आहेत. आयसीआयसीआय डायरेक्ट या ब्रोकर चे भारतामध्ये 90 पेक्षा जास्त शाखा आहेत. आयसीआयसीआय डायरेक्ट मध्ये आपण ऑनलाईन तसेच ऑफलाईन फोन द्वारे ट्रेडिंग करू शकतो. ही सुविधा फक्त आयसीआयसीआय डायरेक्ट ब्रोकर देतो. आयसीआयसीआय डायरेक्ट ही भारतामध्ये पन्नास लाख पेक्षा जास्त ग्राहक संख्या आहे.
या ब्रोकर मार्फत आपण इक्विटी, डेरिव्हेटिव्ह, म्युचल फंड, आय पी ओ, एफडी, बोंड, करेन्सी यांसारख्या सेगमेंटमध्ये गुंतवणूक करू शकतो. तसेच आपण आयसीआयसीआय डायरेक्ट मध्ये ट्रेडिंग अकाउंट डिमॅट अकाउंट आणि बँक अकाउंट असे थ्री इन वन अकाउंट ओपन करू शकतो.
शिल्पा कुमार या आयसीआयसीआय डायरेक्ट मध्ये मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. या ब्रोकरेज मध्ये आपण वेबसाईट किंवा मोबाईल ॲप वरून ट्रेडिंग करू शकतो. आयसीआयसीआय डायरेक्ट चे प्ले स्टोअर वर एक मिलियन पेक्षा जास्त डाउनलोड आहेत. तसेच आयसीआयसीआय डायरेक्ट मध्ये डिमॅट अकाउंट ओपन करणे पूर्णपणे फ्री आहे.
आयसीआयसीआय डायरेक्ट रेफ्रल प्रोग्राम
आयसीआयसीआय डायरेक्ट मध्ये आपण आपल्या मित्रांना किंवा नातेवाईकांना रेफर करूनही पैसे कमवू शकतो, या साठी आपले आयसीआयसीआय डायरेक्ट मध्ये अकाउंट आसने गरजेचे आहे. वर दिलेल्या लिंक वरून तुम्ही तुमचे डिमॅट अकाउंट ओपन करू शकता. आयसीआयसीआय डायरेक्ट मध्ये तुम्ही प्रत्येक रेफर साठी 750 रुपये कमवू शकता. या मध्ये जेव्हा तुमचा मित्र तुमच्या रेफर लिंक वरून अकाउंट ओपन करेल तेव्हा तुम्हाला 450 रुपये मिळतील आणि जेव्हा तुमचा मित्र पहिला ट्रेड करेल तेव्हा बाकीचे 300 रुपये मिळतील. आयसीआयसीआय डायरेक्ट मध्ये तुम्ही एका महिन्या जास्तीत जास्त 100 अकाउंट ओपन करू शकता, त्या पेक्षा जास्त अकाउंट ओपन केल्यास त्याचे जास्तीचे पैसे मिळणार नाहीत.
निष्कर्ष
या पोस्ट मध्ये आपण बघितलं की भारतामध्ये कोणते सर्वात चांगले ब्रोकर आहेत. त्या बरकेर विषयी थोडक्यात माहिती बघितली, तसेच आपण आपल्या मित्रांना रेफर करूनही पैसे कसे कमवू शकतो हीही आपण बघितलं. तुम्हाला ही पोस्ट आवडली असेल तर या पोस्ट ची लिंक तुम्ही तुमच्या मित्रांसोबत शेअर करू शकता. आणि तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कंमेंट ऑक्स मध्ये नक्की कळवा.